Green Riyadh Project जगातील सर्वांत महत्त्वाकांक्षी शहरी वनीकरण प्रकल्पांपैकी एक म्हणजे ‘ग्रीन रियाध प्रकल्प.’ दि. 19 मार्च 2019 रोजी सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ यांनी रियाधच्या चार मेगा प्रोजेक्ट्सपैकी एकाचे अनावरण केले. या प्रकल्पासह रियाधला जगभरातील ‘टॉप 100’ राहण्यायोग्य शहरांच्या यादीत नेणे, हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट.
Read More
व्यापार सक्षमीकरणासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल २४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात रियाध मध्ये वरिष्ठ नेते आणि व्यावसायिकांची भेट घेणार आहेत. गोयल सौदी अरेबियातील रियाध येथे फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्हच्या (एफआयआय) सातव्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत.
अमेरिकन वृत्तपत्र 'वॉशिंग्टन पोस्ट'चे पत्रकार जमाल खगोशी यांच्या हत्येप्रकरणी आठ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यापैकी पाच जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. तीन अन्य जणांनाही एकूण २४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सौदी सरकारच्या पक्षातर्फे सांगण्यात आले की, पत्रकार खगोशी यांची हत्या काही जणांनी केली होती. या प्रकरणी ११ जणांवर खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, ही नावे गुप्त ठेवण्यात आली होती.
'भारतीय अर्थव्यवस्था सुस्त जरी असेल तरीही येत्या तिमाहीत पुन्हा उभारी घेईल', असा विश्वास उद्योगपती मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. सौदी अरेबिया येथील 'फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह'मध्ये उपस्थितांना संबोधित कराताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर हा कार्यक्रम सुरू आहे. यात मुकेश अंबानी यांच्यासह भारतातील अनेक दिग्गजांचा सहभाग होता. भारतातील अर्थव्यवस्थेबद्द्ल त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
सीरियाचे भारतातील राजदूत रियाद अब्बास यांनी म्हटले आहे की ,"भारत सरकारने घटनेचा कलम ३७० हटविणे ही देशातील अंतर्गत बाब आहे. जगातील कोणत्याही देशाला आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी योग्य ती पावले उचलण्याचा अधिकार आहे", असे म्हणत त्यांनी भारताच्या या निर्णयाचे स्वागत केले.