काश्मीरमुद्द्यावर 'सीरिया'ही भारतासोबत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |



नवी दिल्ली : पाकिस्तानाने काश्मीर मुद्द्यावरून पाठिंबा मिळवण्यासाठी संपूर्ण जगासमोर अकालतांडव केल्यानंतरही त्यांच्या मागणीला कोणीही थारा दिला नाही. इम्रान खान जगभर फिरल्यानंतरही बहुतेक देशांनी काश्मीरला भारताची अंतर्गत बाब असल्याचे म्हटले. याच यादीत आता पुन्हा एका देशाचे नाव जोडले गेले आहे. सीरियाचे भारतातील राजदूत रियाद अब्बास यांनी म्हटले आहे की ,"भारत सरकारने घटनेचा कलम ३७० हटविणे ही देशातील अंतर्गत बाब आहे. जगातील कोणत्याही देशाला आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी योग्य ती पावले उचलण्याचा अधिकार आहे", असे म्हणत त्यांनी भारताच्या या निर्णयाचे स्वागत केले.


अब्बास पुढे म्हणाले की
, "कोणत्याही सरकारला आपल्या भूमीवरील नागरिकांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचा अधिकार आहे. कोणत्याही सरकारला आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी सर्वात चांगला मार्ग शोधण्याचा अधिकार आहे. हे काश्मीरवरील पाऊल अंतर्गत समस्या आहे. आम्ही प्रत्येक कृतीत नेहमीच भारताच्या बाजूने असतो. यावेळी उत्तर-पूर्व सिरियात 'एकतरफा लष्करी हल्ले' करण्याच्या तुर्कीबद्दलच्या भारताच्या विधानाचे अब्बास यांनी स्वागत केले. ते म्हणाले की," सीरियन सरकार आणि माझ्या देशातील लोक या प्रकरणी भारत सरकारच्या भूमिकेचे कौतुक करतात आणि पुढील सहकार्यासाठी त्यांच्याशी हातमिळवणी करण्यासाठी आमचा देश आशावादी आहे."


राजदूत म्हणाले
, “तुर्की दहशतवादाचे समर्थन करते आणि तुर्कीचे समर्थन करणारे सर्व देश दहशतवादाचे समर्थन करतात.यावेळी सीरियामधील तुर्की सैन्य हल्ल्यांना पाकिस्तानने पाठिंबा दर्शविल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पाकिस्तानला हा टोला लगावला. सीरियामधील कुर्द सैन्याच्या विरोधात झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानने तुर्कीला पाठिंबा दर्शविला आहे. तुर्कीने गेल्या आठवड्यात उत्तर सीरियामध्ये कुर्द-प्रणित सीरियन लोकशाही सैन्यांना लक्ष्य केले होते. काश्मीरच्या मुद्यावर तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन केले.



१० ऑक्टोबर रोजी
, ईशान्य सीरियामध्ये तुर्कीच्या सैन्यतर्फे झालेल्या एकतर्फी लष्कराच्या हल्ल्याबद्दल भारताने गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, अंकाराच्या या कारवाईमुळे या प्रदेशातील स्थिरता बिघडू शकते आणि मानवतावादी व नागरी संकट निर्माण होऊ शकते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील एका निवेदनात म्हटले आहे की, ईशान्य सीरियामध्ये तुर्कीने केलेल्या एकतर्फी लष्करी हल्ल्याबद्दल आम्हाला चिंता आहे. तुर्कीच्या या कारवाईमुळे या प्रदेशातील स्थिरता आणि दहशतवादाविरूद्धच्या लढाईचे नुकसान होऊ शकते. त्याच्या कृतीत मानवी आणि नागरी संकट निर्माण करण्याची क्षमता देखील आहे.

@@AUTHORINFO_V1@@