ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या अश्लील आणि हिंसक सामग्रीचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश लवकरच दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म हे लोकप्रिय झाले असून भारतात नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, डिस्ने हॉटस्टार आणि अन्य बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म वापरात आहेत. यावर प्रसारित होणाऱ्या सामग्रीविषयी अनेकदा वाद निर्माण होत असतात. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे समजते.
Read More
नवी दिल्ली : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वार्तांकन करणाऱ्या विविध माध्यम संस्थांचे पत्रकार, छायाचित्रकार विशेषत: खाजगी वाहिन्यांच्या माध्यमकर्मींच्या सुरक्षेबद्दलची गंभीर दखल घेत, त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच, या चक्रीवादळाचा प्रभाव कमी करण्यासाठी, केंद्र आणि राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नरत राहील, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिला आहे.
नवी दिल्ली : सध्याच्या माहिती तंत्रज्ञान कायद्याची जागा घेणाऱ्या बहुप्रतीक्षित डिजिटल इंडिया विधेयकाचा पहिला मसुदा जूनच्या पहिल्या आठवड्यात सार्वजनिक सल्लामसलत करण्यासाठी प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि राज्यमंत्री माहिती तंत्रज्ञान राजीव चंद्रशेखर यांनी बुधवारी मुंबई येथे दिली आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बेकायदेशीर पद्धतीने वीज कंपन्यांच्या खर्चाने खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवासाची माहिती केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने मागवली आहे. राज्यातील चारही वीज कंपन्यांकडून ही माहिती मागवली गेली आहे.