नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेंट्रल पार्क, सेक्टर-3, घणसोली येथे मिनी ऑलिम्पिक आकाराचा सर्व सुविधायुक्त जलतरण तलाव 15 मे 2025 पासून नागरिकांच्या वापरास खुला करण्यात आलेला आहे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सदर जलतरण तलाव अतिशय माफक दरामध्ये उपलब्ध करुन देण्यावर भर दिला असल्याने नागरिकांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
Read More
मुंबई महापालिकेच्या १० जलतरण तलावांवर उन्हाळी सुट्टी दरम्यान पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे.
पुणे : पुण्यात मनसेने तलावात क्रिकेट खेळत हटके आंदोलन केले आहे. हे आंदोलन करण्याचे कारण म्हणजे औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड जलतरण तलाव तात्काळ सुरू करण्यात यावे, यासाठी मनसेने हे आंदोलन केले. त्यासाठी मनसेने नवी शक्कल लढवत तलावात क्रिकेट खेळून आंदोलन केले आहे. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. मनसेकडून हे आंदोलन करण्याकरिता स्विमिंग सूट ,गॉगल, ट्यूब वापरण्यात आले. स्विमिंग सूट ,गॉगल, ट्यूब परिधान करून तलावात क्रिकेट खेळून हे आंदोलन करण्यात आले.
वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील लोकमान्य पाडा नं. १, आकृती गृहसंकुलाच्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचे निवडणुकीच्या तोंडावर नामकरण करून अडीच वर्ष लोटले तरीही अद्याप हा जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही, अशा पद्धतीने हा जलतरण तलाव बंद राहिल्यास येथील सामानाची नासधूस होण्याची शक्यता आहे.