Murlidhar Mohol पाच वर्षात सहकार क्षेत्राला १७ लाख प्रशिक्षित तरुणांची गरज भासणार आहे. त्याकरिता सहकार क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्य आधारित प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासेल. त्यासाठी त्रिभुवन सहकार विद्यापीठ सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देईल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत केले आहे.
Read More
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त पुणेकराला तातडीने पोर्ट ब्लेअरहून पुण्यात आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सर्व यंत्रणा युद्धपातळीवर राबवत त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. मंत्री मोहोळ यांनी ग्रीन कॉरिडॉर करण्याच्या सूचना दिल्याने एअर एम्बुलन्सने अवघ्या १३ मिनिटांत पुणे विमानतळ ते पूना हॉस्पिटलचे अंतर कापले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महानगरातील विकासकामांना गती कशी देता येईल, त्यादृष्टीने अनेक निर्णय घेतले आणि प्रशासनासोबत बैठका घेत, त्या कामांना गती देण्यासाठीदेखील पुढाकार घेतला. यामुळे ‘मेट्रो’ प्रकल्पाचे पुढील काम, रेल्वे कामांना गती आणि विशेषतः विमानतळ टर्मिनल आणि विमानांच्या सेवांमध्ये वाढ अशी कामे झाल्याचे अलीकडील काळात बघायला मिळाले. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु झाली आहेत. शिवाय, या विमानतळाचे ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्र
‘लोकतंत्र न बहुमत का शासन हैं, न अल्पमत का; यह जनता के इच्छा का शासन हैं।’ तत्त्वचिंतक आणि अंत्योदयाचा विचार मांडणार्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या या उक्तीला साजेशा पद्धतीने प्रभावी प्रशासन राबविणारे देवेंद्र फडणवीस यांना अवघा महाराष्ट्र पाहतो आहे. जनतेच्या इच्छा-आकांक्षांची अचूक जाण, त्यानुसार कृती, राज्याला अव्वल स्थानावर नेण्यासाठीची दीर्घदृष्टी ही देवेंद्रजींची वैशिष्ट्ये असल्याने ते प्रभावी नेता ठरले आहेत. कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व यांचा सुयोग्य संयोग असलेल्या देवेंद्रजींच्या गळ्यात पुन्हा मु
राज्यभरात सध्या मुख्यमंत्री कोण होणार? अशा चर्चा सुरु असतानाच खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव माध्यमांमधून पुढे आले होते. दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठीची चर्चा कपोलकल्पित आहे, असे म्हणत त्यांनी या चर्चेला पुर्णविराम दिला.
ठाणे : “महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकांचे राज्य बनवण्याचा संकल्प भाजप महायुतीने केला आहे. तेव्हा, महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या,” असे आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol ) यांनी केले. तसेच, “लाडकी बहीण योजने’वर आधी टीका करणारे आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचे खोटे आश्वासन देत आहेत,” अशी टीकाही खा. मोहोळ यांनी केली.
‘नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना या विमानतळाच्या पाहणीदरम्यान दिली.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या बहुप्रतिक्षित ओएलएस सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने सोमवार दि.२४ रोजी मंजुरी दिली. यामुळे पुण्यातून मोठ्या विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या पाठपुराव्याला पहिल्याच प्रयत्नात यश आले आहे.
लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण पूर्णत: निवळत नाही, तोवर आता पुणेकरांच्या समस्यांसाठी आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून लोकप्रतिनिधींनी कंबर कसलेली दिसते.पुणे महानगराची एकीकडे विकासाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे चित्र असताना, अलीकडील काळातील काही अप्रिय घटनांनी मात्र या चित्रावर नेमकी फुली मारली गेली.
केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारताच मुरलीधर मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये असून पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत नवे टर्मिनल कार्यान्वित करणे, अपघातग्रस्त विमान ‘बे’वरून हटविणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
मोदी सरकारचे खातेवाटप Modi Cabinet जाहीर झाले असून अनेक मंत्र्यांचे मागील खाते कायम राहिले आहेत. तर काही मंत्र्यांना नवीन खाती देण्यात आली आहेत. सोमवार, १० जून रोजी एनडीए सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं. दरम्यान, राज्यातील ६ मंत्र्यांचं खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे.
तुमच्या बगलबच्च्या कंत्राटदारांना दूर ठेवा, असा खोचक टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे. रविवारी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावर सुप्रिया सुळेंनी टीका केली होती. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शिक्षण, सामाजिक चळवळी, राजकीय चळवळी, आर्थिक चळवळी या सर्वांचे पुणे प्रमुख केंद्र. अशा शहराचा लोकप्रतिनिधीही तेवढाच सक्षम हवा. पुण्याच्या ताकदीची नेमकी जाण असलेले मुरलीधर मोहोळ हे शहराचे खासदार झाले आहेत. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे नवी दिल्ली प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी त्यांच्याशी विशेष संवाद साधला. त्यावेळी पुण्याच्या विकासासाठी पुढील ५० वर्षांचे व्हिजन ठेवून काम करणार असल्याचा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
रा.स्व.संघाचे स्वयंसेवक, भाजप कार्यकर्ता, महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष, पुणे शहराचे महापौर अशा विविध जबाबदाऱ्या लिलया पेलणारे मुरलीधर मोहोळ यांचा पुणे शहर आणि परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. हेच पाहता मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतने केलेली बातचीत.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या शनिवारी १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने पुणे महापालिकेने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या ' पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या ' या उपक्रमात तीन हजार ७७ पालकांनी सहभागी होत, त्यांनी आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटे गोष्ट सांगितली. ही गोष्ट पूर्ण होताच पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा चीनचा रेकॉर्ड मोडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला
लोकमान्य टिळक पुरस्कार आणि विविध विकास प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौर्यावर येत आहेत. या दौर्यामुळे महाविकास आघाडीला पोटशूळ उठला आहे. मोदी यांना काळे झेंडे दाखवित आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे. ज्या ठिकाणी विरोधक आंदोलन करतील त्याठिकाणी जाऊन भाजपा देखील आंदोलन करणार आहे. मोदी द्वेषाने पछाडलेले विरोधक मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची बोचरी टीका प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात तीन दिवसांचे वगनाट्य चालल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. शरद पवार यांनी राज्यातील अनेक शिक्षण संस्था आणि सहकारी संस्थांच्या घटनांमध्ये बदल करुन त्याचे अध्यक्षपद मिळविल्याचा आरोपही त्यांनी केली.
''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीत घडामोडी घडणारच. आमच्याशी अदयाप तरी कुणीही भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात विचारणा केलेली नाही अथवा कुणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही. तसेच कुठल्याही भाजप नेत्यानेही राष्ट्रवादीतील नेत्यांशी संपर्क साधलेला नाही. मात्र जर कुणी स्वतःहून भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी तयार असेल तर आम्ही त्याचा पक्षप्रवेश नक्की करून घेऊ,'' असे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
पुणे महापालिकेकडून मिळकत करातून देण्यात येणारी ४० टक्के सवलत रद्द करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.
पुण्यातील महत्वपूर्ण मुद्द्यांवरून आज २९ जून रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक होते आहे. मात्र या बैठकीचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना आमंत्रणच देण्यात आलेले नाही.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना पुणे महानगरपालिका सक्षमपणे करत असून तज्ञांची मते लक्षात घेता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्जता ठेवण्यास प्राधान्य देत आहोत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या पुणे महानगरपालिका, 'स्व' रूपवर्धिनी, 'सेवा सहयोग' व 'सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प' या संस्थांच्या कोरोनादूतांचा सन्मान
मराठी साहित्यात आणि मराठी जनतेच्या मनात अलौकिक ठसा उमटविणारे, ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाणारे ‘गदिमा’ यांचे गेली अनेक दशकं रखडलेलं स्मारक आता पुणे येथे महात्मा सोसायटी, कोथरूडला साकार होतंय. स्मारकाच्या या जागेचा भूमिपूजन सोहळा नुकताच २२ मार्चला संपन्न झाला. हा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या, गदिमांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडला. याविषयी जाणून होतेच, पण नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्याशी बोलून स्मारकाविषयी आणखी जाणून घेतले.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली भावना
'जम्बो'त रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी साधला संवाद
भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना ९९ मते तर राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे प्रकाश कदम यांना ६० मते