(Vasantdada Patil Pratishthan's College of Engineering and visual arts) मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ५८व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या जिल्हा फेरीत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी आणि व्हिज्युअल आर्ट्स महाविद्यालयाने भव्य कामगिरी करत एकूण पाच पारितोषिके पटकावली आहेत.
Read More
आर्थिक स्थैर्य देणारी नोकरी सोडून, स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करत ‘अपूर्वा क्रिएशन्स’ हा ब्रॅण्ड प्रस्थापित करणार्या उद्योजिका अपूर्वा दारशेतकर यांच्या जीवनप्रवासाविषयी...
तरुण चित्रकार ‘कुडलय्या’ (की कुडल्या?) हिरेमठ यांच्या जलरंग माध्यमातील कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर कलादालनात सुरू आहे. त्यांच्या प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा त्यांची जरी भेट झाली नसली, तरी त्यांच्या कलाकृती खूप काही सांगून गेल्या. कलाकारांची ओळख ही त्यांच्या कलाकृतींद्वारे होत असते. हिरेमठ यांची ही ओळख अशाच पद्धतीची आहे. त्यांच्याविषयी लिहिण्यापेक्षा त्यांच्या कलाकृतीविषयी आणि त्यांच्या चित्रांविषयी लिहिणं अधिक संयुक्तिक होईल. कारण, त्यांची कलासाधना ज्या दिशेने चालली आहे, ती अद्भुत आहे. त्यांच्या कलाकृतींचं
चित्रकार अभय मुरलीधर यांच्या कलाकृतींमधील विशुद्ध रंगांची उधळण त्यांच्या स्वयंशिक्षणातून त्यांना प्राप्त झालेली दिसते. त्यांच्या ‘कॅनव्हास’वर ब्रशचे फटकारे आत्मविश्वासपूर्वक आणि अकृत्रिम भासतात. त्यांच्या प्रत्येक ‘कॅनव्हास’वरील रचना ’लेआऊट्स’ याद्वारे त्यांचा अनुभव ध्यानात येतो. त्यांच्या ’कॅनव्हास’वरीलकाही आकार हे निसर्गातील घटकांची आठवण करून देतात.