सांगलीच्या अवलियाने ठाण्यात विश्वविक्रम केला आहे. पंडित तुकाराम धायगुडे (४३) असे त्यांचे नाव असून ते ठाणे जिल्हा बँकेत शिपाई आहेत. त्यांनी २५७ किलो वजनाच्या सहा दुचाकी ३७७ वेळा चक्क पोटावरून नेण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वीही १२२ वेळा पोटावरून दुचाकी नेऊन धायगुडे यांनी ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदवला होता. रविवारी ठाणे पूर्वेकडील धर्मवीर क्रीडासंकुलात धायगुडे यांनी आपलाच हा विश्वविक्रम मोडून नवा विक्रम स्थापित केला आहे. या विश्वविक्रमी कामगिरीमुळे धायगुडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Read More
पोटावरून अवजड दुचाकी नेण्याचा पराक्रम गाजवून पुन्हा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्यासाठी सज्ज झालेल्या विश्वविक्रमी पंडित धायगुडे यांच्याविषयी...