समृद्धी महामार्गावर उभ्या वाहनातून डिझेल चोरीचे प्रकरण चर्चेत येत आहेत. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रक, कंटेनरसारख्या गाड्यांच्या डिझेल टँकमधून पाईप आणि मोटरच्या सहाय्याने डिझेल चोरी केली जात होती. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला होता. या टोळीतील एकाला बेड्या घालण्यात वाशिम पोलिसांना यश आले आहे. अनिल पवार, गजानन पवार, योगेश दाजी ह्या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
Read More
मुलुंड पश्चिम येथे "द केरळ स्टोरी" सारखी घटना घडली आहे. यासंबंधी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. २६ वर्षीय मोहम्मद फैजान हा प्रयागराज (अलाहाबाद) उत्तर प्रदेश येथे राहत असुन तो कॅपिटल मार्केटशी संबंधित एक वर्षाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी ठाणे येथे आला होता. फैजानने दि. १४ जून रोजी मुंबई येथील २१ वर्षीय जैन हिंदू मुलीला घेऊन पळून गेला आहे,
' द केरला स्टोरी' या चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होताना दिसते आहे. यामुळेच आता लव्ह जिहादचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. मध्य प्रदेशात इंदूर मध्ये एक तरूणी आपल्या प्रियकारासोबत 'द केरला स्टोरी' हा चित्रपट पाहायला गेली. चित्रपट पाहून परत आल्यानंतर तिचा आपल्या प्रियकरासोबत वाद झाला. त्यानंतर तरूणीने आपल्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला.