( 11 petitions filed in Supreme Court challenging Waqf Act ) केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा कायद्याविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासह (एआयएमपीएलबी) ११ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी वक्फ सुधारणा कायद्यास राज्यांनी विरोध करणे हा भारतीय राज्यघटनेसोबत द्रोह आहे, असे भाजप खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सुनावले आहे.
Read More
२०२३ या वर्षाअखेरीस आयकर विभागाने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. २०२३-२४ या वार्षिक सत्रामध्ये तब्बल ८ कोटी आयकर रिटर्न जमा करण्यात आला आहे. आयकर विभागाने यासंदर्भात Xवर पोस्ट केली आहे. आयकर विभागाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या अतुल्यनीय कामगिरीपर्यंत आम्ही पहिल्यांदाच पोहोचलो आहोत.
'सामाजिक कार्यकर्त्या’ मेधा पाटकर यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकी प्रकरणी मध्य प्रदेशात औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेधा पाटकर आणि इतर अनेकांवर आदिवासी मुलांना शिक्षण देण्याच्या नावाखाली निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या संदर्भात मेधा पाटकर आणि अन्य ११ जणांविरुद्ध मध्य प्रदेशातील बारवानी येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यादरम्यान दूरध्वनीवरून सुमारे ४५ मिनीटे चर्चा झाली. यावेळी अफगाणिस्तानातील परिस्थिती आणि भारत–रशिया सहकार्य याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये झाली. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबिज केली आहे. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणस्तानमधील स्थितीविषयी अमेरिकेसह भारत आणि रशियाचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे.