आंबा महोत्सवातून आंबा उत्पादकांना मदतीचा हात देणार्या आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सात ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून सुमारे २०० महिलांना रोजगार मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. महिलांना या उपक्रमातून रोजगार मिळणार असल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.
Read More
पुणे महापालिकेतील नगरसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत दरवर्षी सैनिकांना दिवाळी फराळ पाठवला जातो. यासाठी कर्मचारी वर्गणी जमा करून , सामाजाप्रती जाणीव म्हणून आणि समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून मदत करत असतात. यावर्षी देखील कर्मचाऱ्यांनी सैनिकांना दिवाळी फराळ पाठवला आहे . सोबतच पुणे महापालिकेत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी फराळाचे वितरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर यांची उपस्थिती होती.
गेले दीड वर्ष असलेली कोरोनाची मरगळ झटकून पुणे भाजपच्या वतीने पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या पक्ष कार्यालयाजवळ दिवाळी निमित्त दिवाळी फराळ व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंधारातून तिमिराकडे नेणारा सण अशी दिवाळी सणाची ओळख आहे. ह्या दिवाळी फराळानिमित्त शहर अध्यक्षांतर्फे पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.