पुणे : गेले दीड वर्ष असलेली कोरोनाची मरगळ झटकून पुणे भाजपच्या वतीने पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या पक्ष कार्यालयाजवळ दिवाळी निमित्त दिवाळी फराळ व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंधारातून तिमिराकडे नेणारा सण अशी दिवाळी सणाची ओळख आहे. ह्या दिवाळी फराळानिमित्त शहर अध्यक्षांतर्फे पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.
पुणे शहर भाजप अध्यक्षांच्या आमंत्रणाचा स्विकार करून पुणे शहरातून मोठ्या संख्येने या दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमास अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार गिरीशजी बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, मा.मंत्री दिलीप कांबळे, मा.आमदार बापूसाहेब पठारे, योगेश टिळेकर, विजय काळे, धिरज घाटे,स्थायी समिती चे अध्यक्ष हेमंत रासने, भाजप सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येणपुरे, दिपक पोटे, दीपक नागपुरे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर, बापू मानकर, अर्चना पाटील, यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी व सर्वच पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.