पुणे: पुणे महापालिकेतील नगरसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत दरवर्षी सैनिकांना दिवाळी फराळ पाठवला जातो. यासाठी कर्मचारी वर्गणी जमा करून , सामाजाप्रती जाणीव म्हणून आणि समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून मदत करत असतात. यावर्षी देखील कर्मचाऱ्यांनी सैनिकांना दिवाळी फराळ पाठवला आहे . सोबतच पुणे महापालिकेत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी फराळाचे वितरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर यांची उपस्थिती होती.
पुणे महापालिका नगरसचिव कार्यालय कर्मचारी व मित्र परिवार कडून पुणे मनपा मध्ये इमारत मधील स्वच्छतेचे काम करणारे कंत्राटी कामगार व त्यांचे सुपर वायजर अश्या 54 कामगारांना कर्मचार्यांकडून दिवाळीची भेट म्हणुन मिठाई (प्रत्येकी ५ किलो ) वाटप करण्यात आले. तसेच सालाबादाप्रमाणे भारतीय सैनिकांना देखील दिवाळी फराळ पाठविण्यात आला.
सदर कार्यक्रमास स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर , योगिता भोसले, प्रोटोकॉल ऑफिसर तसेच नगरसचिव कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.