सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गावात 'मॅकक्वीनस् बस्टर्ड' नावाचा पक्षी आढळून आला आहे. गावातील एका गावकऱ्याच्या घराच्या आवारात हा पक्षी आढळून आला. घरातील पाळीव मांजर या पक्ष्याच्या मागे लागल्यामुळे घरातल्यांना त्याचे अस्तित्व लक्षात आले. हा पक्षी अबू धाबीहून पाकिस्तान मार्गे भारतात आल्याचे लक्षात आले. या पक्ष्याच्या पायांवर असेलेल्या दोन विशिष्ट रिंग होत्या. त्यावर काही अक्षरे आणि आकडे होते. त्यातील एका रिंग वर अबू धाबी लिहले होते.
Read More
पाकिस्तान सरकार मग ते कोणत्याही पक्षाचं असो, भुत्तोंची पाकिस्तान ‘पीपल्स पार्टी’ असो, नवाझ शरीफांची ‘मुस्लीम लीग’ असो वा वर्तमान पंतप्रधान इमरान अहमद खान नियाझींची ‘तहरीके इन्साफ पार्टी’ असो, हे सर्व लोक अरबी देशांमधल्या मोठ्या मोठ्या धेंडांना पाकिस्तानात येऊन शिकार करण्याचे अधिकृत परवाने देतात का? उत्तर स्पष्टच आहे. या श्रीमंत अरबांनी पाकिस्तानात भरपूर आर्थिक मदत द्यावी.
भारताचे अक्षयऊर्जा ध्येय पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच सौर आणि पवनऊर्जेसारखी अक्षयऊर्जा निर्माण करणे काळाची गरज आहे. मात्र, त्याकरिता संकटग्रस्त पक्ष्यांचा जीव धोक्यात घालून हे ध्येय पूर्ण करणे योग्य नाही.
सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी एक युक्तिवाद रंगला. हा युक्तिवाद होता जगातून नामशेष होण्याच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या माळढोक पक्षाच्या संरक्षणाबाबत. विद्युतवाहक तारांमध्ये अडकल्याने मृत्युमुखी पडणार्या या प्रजातीच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
राजस्थानच्या पोखरणमधील उपक्रम
राज्यात माळढोकचे पुनरुज्जीवन किंवा त्यांच्या संख्येत वाढ ही केवळ एक-दोन पक्ष्यांच्या भरवशावर होणार नाही.