कोकण प्रदेशी आला 'हा' अनोखा पाहुणा

दुबईहून "मॅकक्वीनस् बस्टर्ड"ची कोकण वारी

    14-Nov-2022
Total Views |
HOubara
 
मुंबई(विशेष प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (कोकण) देवगड तालुक्यातील मुणगे गावात 'मॅकक्वीनस् बस्टर्ड' नावाचा पक्षी आढळून आला आहे. गावातील एका गावकऱ्याच्या घराच्या आवारात हा पक्षी आढळून आला. घरातील पाळीव मांजर या पक्ष्याच्या मागे लागल्यामुळे घरातल्यांना त्याचे अस्तित्व लक्षात आले. हा पक्षी अबू धाबीहून पाकिस्तान मार्गे भारतात आल्याचे लक्षात आले. या पक्ष्याच्या पायांवर असेलेल्या दोन विशिष्ट रिंग होत्या. त्यावर काही अक्षरे आणि आकडे होते. त्यातील एका रिंग वर अबू धाबी लिहले होते.
 
मध्य आशियातील अबुधाबी येथील 'इंटरनॅशनल फंड फॉर होबरो काँझरवेशन' या संस्थेने या पक्ष्याच्या स्थलांतरआणि प्रजननाचा अभ्यास करण्यासाठी टॅग केले आहे. या पक्ष्याला ऑगस्ट महिन्यात टॅग करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पक्ष्याने मध्य आशियाहून पाकिस्तान मार्गे कच्छ असा आहे. परंतु या पक्ष्याची वाट चुकल्यामुळे भरकटला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रत हा यापूर्वी कधी आढळुन आल्याची नोंद नाही. मॅकक्वीनस् बस्टर्ड (क्लॅमिडॉटिस मॅक्वेनी) हा बस्टर्ड कुटुंबातील एक मोठा पक्षी आहे. या पक्ष्याचा मूळ अधिवास आशियातील वाळवंट आणि गवताळ प्रदेशात सिनाई द्वीपकल्पापासून पश्चिमेला कझाकस्तानच्या पूर्वेस मंगोलियापर्यंत पसरलेले आहे. मॅकक्वीनच्या बस्टर्डला हौबारा बस्टर्डची उपप्रजाती म्हणून ओळखले जात असे आणि "एशियन हौबारा" म्हणून ओळखले जात असे.