Language

‘बिहार’च्या धसक्यामुळे काँग्रेसची ठाकरेंच्या मेळाव्याकडे पाठ ; ‘वंचित’ची गैरहजेरी; हिंदुत्ववादी राज ठाकरेंना करावे लागले कम्युनिस्टांचे स्वागत

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी वरळीच्या डोम मैदानात झालेला मेळावा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. या मेळाव्याला भाकपचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, माकपचे अजित नवले, रासपचे महादेव जानकर, विनोद निकोले आणि भालचंद्र मुणगेकर यांनी हजेरी लावली. मात्र, काँग्रेसने या मेळाव्यापासून जाणीवपूर्वक अंतर राखले. राज ठाकरेंच्या याआधीच्या आक्रमक भूमिकेमुळे बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याची भीती काँग्रे

Read More

दरवर्षी ३ ऑक्टोबरला 'अभिजात मराठी भाषा दिवस' - भव्य-दिव्य आयोजन होणार; आठवडाभर व्याख्याने, प्रदर्शने, विविध स्पर्धांचे नियोजन

मराठी भाषेला मिळालेला 'अभिजात' दर्जा केवळ कागदोपत्री न राहता, जनमानसात रुजवण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मराठीच्या गौरवशाली अडीच हजार वर्षांच्या परंपरेचा जागर करण्यासाठी, आता दरवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' देखील साजरा केला जाईल, असे मराठी भाषा विभागाने शुक्रवारी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि संशोधनाला गती मिळणार

Read More

ना झेंडा, ना अजेंडा... नेता कोण? - राज-उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा ठरली; पण शेवटी भाषण कोण करणार, यावर घोडे अडले

त्रिभाषा सूत्रावरून उगाचचा गोंधळ घालणाऱ्या ठाकरे बंधूंना अखेर एकत्र येण्यासाठी कारण मिळालं. सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर दोघांनीही 'विजयी सभा' जाहीर केली, जणू काही हा लढा त्यांनीच उभारला होता! ५ जुलै रोजी वरळीच्या डोम मैदानावर ही सभा होणार आहे. पण या तथाकथित एकजुटीला ना मराठी भाषेचं भान आहे, ना मराठी माणसाच्या भविष्याची चिंता. फक्त एकत्र येण्याचं निमित्त हवं होतं, ते मिळालं इतकंच. बरं, इतकं करूनही आतल्या गोटात सध्या गोंधळ आहे तो ‘शेवटी भाषण कोण करणार?’ या मुद्द्यावर! राज ठाकरे हे प्रभावी भाषणांसाठी ओळखले

Read More

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही! - मंत्री आशिष शेलार; राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक

“महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून, राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही. तर, पूर्वीपासून पाचवी ते आठवीपर्यंत असलेली हिंदीची सक्ती आमच्या सरकारने काढून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी उपलब्ध करुन दिली, तसेच अन्य पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या चर्चा अवाजवी, अतार्किक आणि अवास्तव आहेत. आम्ही मराठीचे आणि विद्यार्थी हिताचे खंदे पुरस्कर्ते आहोत”, अशी स्पष्ट भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सो

Read More

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम तमिळ भाषेत प्रसारित करा, गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

Amit Shah तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.

Read More

"आपली मुलं महागडया शाळेत शिकतात तिथंही हिंदी भाषा शिकवली जाते मग.....," राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध करणाऱ्या द्रमुकला अन्नामलाईंकडून चपराक

आपलीही मुलं महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. तिथेही हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषेचे ज्ञान दिले जाते. याला आता अन्नामलाईंनी द्रमुकचे ढोंग आहे का? प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनावले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० वरून तामिळनाडूत मोठा वादंग निर्माण झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन यांनी या धोरणाविरूद्ध आवाज उठवला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे धोरण तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121