वसंतराव भागवत हे सामाजिक अभिसरणाचे प्रणेते : लक्ष्मण सावजी

    दिनांक  21-Feb-2019


 

 

नाशिक : भारतीय जनसंघ, जनता पक्ष आणि भाजपच्या संघटनात्मक उभारणीत मोलाचे योगदान देणारे वसंतराव भागवत यांच्या स्मृतीदिनानिमित्त नाशिक महानगर भाजपतर्फे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी वसंतराव भागवत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. भागवत हे कुशल संघटक होते.

 

जनसंघ व भाजपचे संघटनमंत्री म्हणूनही त्यांनी उत्कृष्टपणे धुरा सांभाळली. सामाजिक अभिसरणाचे ते प्रणेते होते. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते भागवतांना गुरुस्थानी मानत, असे लक्ष्मण सावजी यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी मध्य-पश्चिम मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, शैलेश जुन्नरे, प्रकाश दीक्षित, धनंजय पुजारी, वसंत उशीर, हेमंत शुक्ल, प्रदिप पाटील, सोनल दगडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat