स्मरण...26/11 चे

    26-Nov-2018
Total Views | 53

 
 
26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 197 जण ठार, तर 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते .
 
मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते .या घटनेला आज 10 वर्ष होत आहेत .
 
 
दहशतवाद्यांनी शहरात दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला.
 
 
पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा 26 नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.
 
भारतीय सरकारने कसाबचा कबुलीजबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले, व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने आधी या प्रकरणी आपले हात झटकले, व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इंकार केला.परंतु 7 जानेवारी 2009 रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले. या हल्ल्यांमध्ये कमीतकमी 197 व्यक्ती ठार झाल्या.
 
 
घटनाक्रम
 
गेल्या काही वर्षांत भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधील अनेक हल्ले मुंबईवर झाले आहेत. या हल्ल्यातील बरेचसे दहशतवादी हवा भरलेल्या तराफ्यावजा बोटींवरुन समुद्रमार्गे शहरात आले. या बोटी समुद्रात उभ्या केलेल्या मोठ्या जहाजावरुन सोडण्यात आल्या होत्या.
 
 
26 नोव्हेंबर रोजी रात्री 8.10 वाजता एका अशा बोटीतून आठ तरुण कफ परेडच्या मच्छीमार नगरजवळ आले. सहाजण भारी बॅगा घेउन उतरले तर उरलेले दोघे बोटीतून किनार्‍यालगत पुढे गेले.
 
स्थानिक कोळ्यांनी या सहाजणांची चौकशी केली असता त्यांनी स्वतः विद्यार्थी असल्याचे भासवले. 8.20 वाजता याच प्रकारे इतर दहा व्यक्ती अशाच बोटींतून कुलाब्यात उतरल्या. उर्दू बोलणार्‍या या लोकांना विचारले असता तुम्ही आपले काम करा असे गुरकावून ते दोन गट करून निघून गेले.कोळ्यांनी याची पोलिसांत बातमी दिली असता त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.
 
 
नोव्हेंबर 26ला रात्री 9.20 वाजता हल्ला सुरू झाला. ए.के. 47 असॉल्ट रायफली घेउन दोन दहशतवादी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्रवासी कक्षात घुसले आणि तेथे गोळ्या चालवून त्यांनी हातबॉम्ब फेकले.यात कमीतकमी दहा व्यक्ती ठार झाल्या.
 
याच सुमारास इतर दोघांनी ताज हॉटेलमध्ये सात परदेशी नागरिकांसह 15 जणांना ओलिस घेतले. रात्री अकरा वाजता महाराष्ट्र पोलिस मुख्याधिकार्‍यांचा हवाला देऊन सी.एन.एन.ने अहवाल दिला की ताज होटेलमधील परिस्थिती निवळली आहे आणि सगळ्या ओलिसांना सोडविण्यात आले आहे, पण नंतर उघड झाले की होटेलमध्ये अजूनही ओलिस होतेच.
 
 
इकडे ओबेरॉय ट्रायडेंट होटेलमध्ये इतर काही दहशतवाद्यांनी 40 ओलिस धरले.यावेळी ताज व ओबेरॉय मिळून सहा बॉम्बस्फोट झाल्याची बातमी होती.28 ला पहाटे 4.22ला ताजमहाल हॉटेल पुन्हा पोलिसांच्या नियंत्रणात आल्याची बातमी आली.
 
 
यावेळी कमांडोंनी दोन दहशतवाद्यांना ओबेरॉय हॉटेलमध्ये ठार मारुन इमारतीचा ताबा घेतला. या वेळी दोन्ही हॉटेलना आगी लागलेल्या होत्या व लष्कर व रॅपिड ऍक्शन फोर्सच्या सैनिकांनी त्यांना वेढा घातलेला होता.
 
 
सुमारे 400 लष्करी कमांडो आणि 300 एन.एस.जी. कमांडो तसेच 35-100 मार्कोस कमांडो घटनास्थळी पाठविण्यात आले होते. या शिवाय नेपियन सी रोड आणि व्हिले पार्ले येथे दोन बॉम्ब स्फोट झाले.
 
 
भारतात प्रवेश
 
 
नोव्हें.21,संध्याकाळी कराचीहून एका बोटीतून दहा दहशतवादी निघाले, नोव्हें.22, विनाशक सामुग्रीचे वाटप. प्रत्येकाला 30 गोळ्या असलेली 6-7 मॅगेझिन देण्यात आली.
 
 
याशिवाय प्रत्येकाला 400 गोळ्या, 8 हातबॉम्ब, एक ए.के. 47 असॉल्ट रायफल, स्वयंचलित रिव्हॉल्व्हर, क्रेडिट कार्डे व सुका मेवा देण्यात आला इतर काही दहशतवादी ताजमहाल हॉटेलमध्ये हत्यारे व दारुगोळा घेऊन राहण्यास दाखल झाले.
 
 
नोव्हें. 23, पाकिस्तानहून निघालेल्या दहशतवाद्यांनी कुबेर नावाच्या एक भारतीय ट्रॉलरवर हल्ला केला. त्यातील 4 कोळ्यांना ठार मारुन कप्तानाला भारताच्या किनार्‍याकडे जाण्यास भाग पाडले, नोव्हें. 26, दुपार दहशतवादी मुंबईपासून चार समुद्री मैलावर आल्यावर दुसर्‍या तटरक्षक अधिकार्‍याला ठार केले.
 
 
यानंतर संध्याकाळी दहशतवादी तीन हवा भरलेल्या छोट्या तराफ्यांत चढले आणि कुलाब्याकडे निघाले. पाकिस्तानहून निघालेले ही दहा माणसे कफ परेडजवळ बधवार पार्क येथे आली. हे ठिकाण नरीमन हाउस पासून अर्ध्या किलोमीटरवर आहे.
 
 
नोव्हें.26, रात्री या दहांपैकी चार ताजमहाल होटेलमध्ये आले, दोघे ओबेरॉय ट्रायडेंटला गेले, दोन नरीमन हाऊसला गेले तर उरलेले दोघे, आझम आणि इस्माईल, टॅक्सी करून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघाले.
 
 
ताज हॉटेल
 
 
नोव्हें .26, दहशतवादी ताजमहाल हॉटेलात घुसले. नोव्हें.27, मुंबई पोलिसांनी हॉटेलास वेढा घातला. हॉटेलाच्या मध्यवर्ती घुमटात प्रचंड स्फोट. इमारतीत आग. दोन ट्रकमधून सैनिक दाखल. दर्शनी भागातील लॉबीवर कबजा. सगळ्यात वरच्या मजल्यावर आग, अग्निशमन दल आले. लॉबी आणि हेरिटेज इमारतीत गोळीबार.
 
 
अग्निशमन दलाने शिड्या वापरून 200+ व्यक्तींना सोडवले. दहशतवादी मध्यवर्ती भागातून नवीन इमारतीत गेल्याची बातमी. बाँब पथक आणि कमांडो दाखल. पोलिसांनी मारा वाढवला.
 
 
आग आटोक्यात. दहशतवाद्यांनी 100-150 ओलिसांसह नवीन इमारतीत ठाण मांडले. सुरक्षा दले हल्ल्यासाठी सज्ज. काही व्यक्तींची लॉबीतून सुटका. चेंबर्स क्लबमधून अजून 50 व्यक्तींची सुटका. गोळीबार सुरुच. अजून काही माणसे आत अडकल्याची बातमी. इमारतीच्या आत गोळीबारांच्या झटापटी. अजून 50 व्यक्तींची सुटका. दहशतवाद्यांनी चौथ्या मजल्यावर आग लावली. अजून एन.एस.जी. कमांडो घटनास्थळी दाखल, हॉटेलवर नवीन हल्ला. मोहीम चालूच. सहा मृतदेह मिळाले.
 
 
दहा हातबॉम्बचा स्फोट, मरीन कमांडोंनी इमारतीच्या आतील स्फोटके निकामी केली. आरमारी कमांडोंना सुमारे 15 अधिक मृतदेह मिळाले. इमारतीत नवीन झटापटी व स्फोट. एक दहशतवादी पळून गेल्याची बातमी. पाच अजून स्फोट झाल्याची बातमी. आत उरलेल्या दहशतवाद्यांबद्दल सुधारित अटकळ. पहिल्या मजल्यावरील आग चालूच, दुसर्‍या मजल्यावरही पसरली. इमारतीत चकमकी सुरुच. कमांडोंनी ताजमहाल होटेलवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याचे जाहीर केले. खोल्याखोल्यांतून शोधमोहीम सुरू. जनतेचा रस्त्यांवर जल्लोष.
 
 
ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल
 
नोव्हें.27, एन.एस.जी चे पथक हॉटेलापाशी दाखल, गोळीबाराचा आवाज, सेना व नौदलाच्या पथकाचे आगमन, दोन लहान ग्रेनेडचे स्फोट. इमारतीत अजून कुमक घुसली, काही विदेशी नागरिकांची सुटका, शीख रेजिमेंटीचे आगमन, प्रचंड गोळीबार, एर इंडियाच्या इमारतीतून ओलिसांची सुटका काही विदेशी नागरिकांची रुग्णालयात रवानगी. स्फोटाचा आवाज दोन कंमांडो व 25 सैनिक जखमी झाल्याचा अंदाज. अजून काही ओलिसांची सुटका . एका अतिरेक्याला कंठस्नान. हॉटेलाच्या 4थ्या मजल्यावर आग, ऑपरेशन चालू, ट्रायडंटमधून काही ओलिसांची सुटका, कंमांडो ऑपरेशन संपले 24 ओलिस नागरिक मृत, 2 दहशतवादी ठार एकूण 143 ओलिसांची सुटका.
 
 
नरिमन हाऊस
 
नोव्हें.27, पोलिसांनी आजूबाजूच्या इमारती मोकळ्या करून ताबा घेतला, पोलीस व अतिरेक्यांत गोळीबार, एक अतिरेकी जखमी,अतिरेक्यांनी जवळच्या गल्लीत हातबाँम्ब फेकला, एन.एस.जी. कंमांडोंचे आगमन, नौदलीय हेलीकॉप्टरने सर्वेक्षण, ऑपरेशन चालू, पहिल्या मजल्यावरुन 9 ओलिसांची सुटका, एन.एस.जी कमांडो आणि अतिरेकी यांच्यातील गोळीबार चालूच, ज्यू धर्मगुरू, त्यांची पत्नी व इतर तिघे असे 5 जणांची अतिरेक्यांकडून हत्या, एन.एस.जी. कमांडोंचे 2 अतिरेक्यांना कंठस्नान, एन.एस.जी. कमांडो यांची मोहीम समाप्त. तशी सरकार कडून अधिकृत घोषणा.
 
 
नुकसान
 
या हल्ल्यांमध्ये कमीतकमी 197 व्यक्ती ठार झाल्या. तर 293 जण जखमी झाले. यांत 121 भारतीय, 17 सुरक्षा कर्मचारी आणि 34 परदेशी नागरिक होते. परदेशी नागरिकांपैकी चार ऑस्ट्रेलियन, चार अमेरिकन, तीन केनेडियन, तीन जर्मन, दोन इस्रायली-अमेरिकन, दोन इस्रायली, दोन फ्रेंच तर प्रत्येकी एक ब्रिटिश-सायप्रॉइट, चिनी, इटालियन, जपानी, जॉर्डनी, मलेशियन, मॉरिशयन, मेक्सिकन, सिंगापुरी, थाई आणि मेक्सिकन होते. नऊ अतिरेकी ठार करण्यात आले आणि एकास जिवंत पकडण्यात आले. अँड्रियास लिव्हरास या ब्रिटिश उद्योगपतीचाही हल्ल्यांत मृत्यू झाला होता. तसेच जर्मन दूरचित्रवाणी निर्माता राल्फ बर्केई, फ्रेंच उद्योगपती लूमिया हिरिद्जीआणि तिचा नवरा, नरिमन हाउसमध्ये गॅव्रियेल नोआह होल्त्झबर्ग त्यांची पत्नी रिव्का होल्त्झबर्ग यांचाही मृत्यू झाला होता.महाराष्ट्र सरकार ने प्रत्येक मृताच्या नातेवाईकास 5 लाख रु. तर जखमींना 50,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते .
 
प्रतिक्रिया आणि परिणाम
 
या घटनांनंतर बहुतांश शाळा, महाविद्यालये व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होतो मुंबई शेरबाजार व राष्ट्रीय शेरबाजार बंद ठेवण्यात आले. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले 66 काही आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांनी आपली मुंबईची उड्डाण रद्द केली होती .
 
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, 2008-09।इंग्लंड क्रिकेट संघाच्या भारत दौर्‍यातील सातपैकी शेवटचे दोन सामने या हल्ल्यांमुळे रद्द करण्यात आले. इंग्लंड संघातील खेळाडू घरी परतले पण नंतर कसोटी सामने खेळण्यासाठी परत आले होते.
 
 
या दौर्‍यातील दुसरा कसोटी सामना मुंबईतून चेन्नई येथे हलवण्यात आला होता . 3 ते 10 डिसेंबर दरम्यान होणारी पहिली ट्वेंटी-20 चँपियन्स लीग स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली होती.
 
 
या हल्ल्याच्या निमित्ताने पाकिस्तानने पकडून ठेवलेल्या 379 भारतीय होड्या, नौका व 336 कोळ्यांचा प्रश्न पुढे आला होता . यांपैकी 200 नौका पाकिस्तानने परस्पर विकून ते पैसे हडपले.
 
 
नवी मुंबई येथील आयटीसी फॉर्च्युन हॉटेल सुद्धा बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी मुंबई पोलीसला मिळाली होती, पण त्यात तथ्य नव्हते. नोव्हेंबर 28 रोजी सीएसटी स्थानकात पुन्हा गोळीबार झाल्याच्या अफवा पसरल्यावर तेथे निघालेल्या रेल्वेगाड्या मार्गातच थांबवण्यात आल्या होत्या
 
 
.पंतप्रधान मनमोहनसिंगयांनी विनंती केल्याने पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स या हेरखात्याच्या प्रमुख अहमद शुजा पाशाने भारतास येउन हल्ल्याच्या तपासात मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
 
 
नंतर पाकिस्तान सरकारने हे आश्वासन फिरवून त्याच्या ऐवजी त्यांचा उजवा हात असलेल्या आयएसआय मुख्य निदेशकास भारतात पाठवण्याचे ठरवले. घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
 
 
राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सल्लागार मयंकोटे केलत नारायणननेसुद्धा राजीनामा दिला. परंतु मनमोहनसिंगनी तो स्वीकारला नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही याच दिवशी पदत्याग केल्याच्या आवया उठल्या परंतु त्यात तथ्य नव्हते.
 
 
उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी हे हल्ले म्हणजे किरकोळ घटना आहेत असे वक्तव्य दिल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. डिसेंबर 1 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरुन पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला.
 
 
राष्ट्राला उद्देशून केलेल्या दूरचित्रवाणीवरील भाषणात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी भारत सरकार हे हल्ले करवणार्‍या व्यक्ती आणि संघटनांना सोडणार नाही असे सांगितले. विरोधीपक्ष नेते लालकृष्ण अडवाणीयांनी भारतीय नागरिकांना या आणीबाणीच्या काळात एकजूट राहण्याचे आवाहन केले. या हल्ल्यांवर जगभरातून तीव्र प्रतिसाद उमटले.
 
 
अनेक देशांच्या नेत्यांनी या हल्ल्यांचा निषेध केला. मोसाद या इस्रायेलच्यागुप्तहेरखात्याने या हल्ल्यांनतर अनेक पाश्चिमात्य देशांनी आपल्या नागरिकांना लगेचच भारतात जाण्यापासून परावृत्त केले.
 
 
या घटने नंतर एन. एस.जी.विस्तारीकरण ,पोलिसांना चांगली शस्त्रास्त्रे,दहशतवाद विरोधासाठी नवीन केंद्रीय संस्था स्थापन करण्याबाबाद निर्णय घेण्यात आला.
 
 
पाकिस्तानच्या राजदूताची कानउघाडणी
 
 
डिसेंबर 1 रोजी भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने पाकिस्तानी हाय कमिशनर शहीद मलिकना बोलावून घेउन पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांना लगाम न घातल्या बद्दल अधिकृत तक्रार नोद्वली.परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडून अपेक्षित पावलेही जाहीर केली.
 
पाकिस्तानच्या राजदूतांना सांगण्यात आले की, पाकिस्तानच्या कृती त्यांच्या भारताशी कसे संबंध हवे ते हे ठरवल. मुंबईतील हल्ले पाकिस्तानमधील व्यक्ती व संस्थांनी केले आहेत. भारत सरकारची अपेक्षा आहे की पाकिस्तान अशांविरुद्ध कृती करून दाखवेल.
 
 
पाकिस्तानवर दबाव
 
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कॉन्डोलीझा राइसने पाकिस्तानला या हल्लेखोरांना पकडण्यासाठी आपल्याकडून पूर्ण सहकार करण्याचे आवाहन केले.
 
या प्रसंगानंतर राइस भारताच्या भेटीवर येईल व भारताच्या लोकांसोबत उभे राहण्याचे व त्यासाठी एकत्र काम करण्याचे वचन निभावण्याचे काम करेल असे व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने सांगितले होते.
 
-संकलन
निलेश वाणी,
मो. 8888877610
अग्रलेख
जरुर वाचा
सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121