'कारसेवा ते पाकसेवा'! शेफ विष्णू मनोहर बनवणार रामलल्लांसाठी ७००० किलो राम हलवा!

विष्णु मनोहर यांनी रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात कारसेवा केली होती

    07-Jan-2024
Total Views | 111

vishnu manohar ram halwa 2
 
नागपूर : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सूरु आहे. भारतभर या दिवशी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. नागपुरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या दिवशी राममंदिर परीसरात ७००० किलो हलवा बनवणार आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण ७००० किलो हलवा एकाच वेळी एकाच कढईत बनवला जाणार आहे.
 
 vishnu manohar ram halwa
 
हा हलवा ज्या कढईत बनवला जाणार आहे त्या कढईचे वजनच १३०० ते १४०० किलो इतके आहे. या कढई चा आकार १० फूट बाय १० फूट इतका आहे. १२००० लिटर ची क्षमता असलेल्या या कढईत ९०० किलो रवा, २००० लिटर दूध, १००० किलो तूप, २५०० लिटर पाणी, ७५ किलो वेलची आणि ३०० किलो सुका मेवा वापरुन ७००० किलो हलवा बनवण्यात येणार आहे. हा हलवा राममंदिर परिसरातच बनवला जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर हा हलवा सर्व भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे.
 
vishnu manohar ram halwa
 
या उपक्रमाला 'कारसेवा ते पाकसेवा' अस नाव देण्यात आले आहे. विष्णु मनोहर यांनी रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात कारसेवा केली होती. त्यामूळे हे नाव देण्यात आले आहे. हा हलवा बनवल्यानंतर श्री रामजन्मभूमीच्या नावावर हा एक विक्रमच असणार आहे. विष्णु मनोहर यांनी ३००० किलो खिचडी, ८००० किलो मिसळ, ५००० किलो भाजी, १५०० किलो मसाले भात असे अनेक विक्रम केले आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121