१ मार्चपूर्वी एलआयसीकडे मोबाईल क्रमांक नोंदवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2019
Total Views |



मुंबई : भारतीय आयुर्विमा मंडळ (एलआयसी) १ मार्च, २०१९ पासून डिजिटल युगात पाऊल ठेवणार आहे. याद्वारे ग्राहकांना प्रिमियम भरणा करण्याच्या तारखा चुकल्यास आठवण करून देणारा लघुसंदेश पाठवण्यात येणार आहे. याशिवाय पॉलीसी बंद पडण्याची आणि बोनस जमा झाल्याचीही माहीती मिळणार आहे.

 

एलआयसीतर्फे ही माहीती देण्यासाठी मोबाईलवर सूचना दिल्या जात आहेत. एलआयसीतर्फे पाठवलेल्या लघुसंदेशानुसार, १ मार्च २०१९ पासून पॉलीसी प्रिमियम भरणा करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. ज्या एलआयसी पॉलीसीधारकांना असा संदेश मिळाला नसेल तर एलआयसी केंद्रात जाऊन अद्यावत मोबाईल क्रमांक नोंदणी करावा लागणार आहे. मोबाईल क्रमांक नोंदणी झाल्यानंतर पॉलीसीधारकांना एलआयसीकडून सूचना मिळणे सुरू होईल.

 

कशी कराल मोबाईल नोंदणी ?

तुमचा मोबाईल एलआयसीकड़े नोंदवण्यासाठी तुम्ही तुमच्या एलआयसी प्रतिनिधीशी संपर्क करू शकता. याशिवाय www.licindia.in/Customer-Services/Help-Us-To-Serve-You-Better या लिंकवर जाऊनही मोबाईल क्रमांक नोंदणी शक्य आहे. ०२२-६८२७६८२७ या क्रमांकावरही ही सुविधा उपलब्ध आहे. यानंतर ही सुविधा मिळणार आहे.

 
 
 

एकूण ६५ प्रकारचे लघुसंदेश मिळणार

प्रिमियम भरणा करण्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी, पॉलीसी प्रिमियम कालावधी पूर्ण झाल्याचा, बोनस लॉयल्टी जोडण्यासारखे एकूण ६५ लघुसंदेश पॉलीसीधारकाला मिळणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@