वीजविरहित वाड्यांपासून सौरविश्वविक्रमाकडे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत ‘महावितरण’ने केलेली विक्रमी कामगिरी आज देशासाठी आदर्श ठरत आहे. कृषिपूरक भागात वीजपुरवठा नसलेल्या अनेक वाड्या-पाड्यांमध्ये या योजनेमुळे मोठा बदल दिसून येतो. राज्यात नागरिक घरगुती व कृषिवापरासाठी मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा स्वीकारताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर तरुण उद्योजक आणि ‘स्कॉर्पियन सोलर कंपनी’चे संस्थापक तथा व्यवस्थापक रोहित सुर्वे यांच्याशी साधलेला संवाद...





