एक अत्यंत साधा, निगर्वी आणि कलाध्यापनाशी नाळ जुडलेला व्यासंगी दृश्यकलाकार, ज्यांचं शारीरिक वय मोठे असलं तरी उत्साही मन हे विशीतल्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल, असंच. के. के. वाघच्या ‘एम. व्ही. एम’ या अभ्यासक्रमाला समर्थपणे चालविणारे अधिष्ठाता अशा विविध भूमिका वठवणारे प्रा. बाळ नगरकर सर हे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनाचित्र शैलीमुळे अधिक ओळखले जातात. त्यांच्या कलाशैलीचा परिचय करुन देणारा हा लेख...
Read More
आजच्या लेखाचे नायक हेमंत सुर्यवंशी हे एका अमूर्त शैलीचे जाणकार, अनुभवी दृश्यकलाकार आहेत. सांस्कृतिक विभागात महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलेले आहे. व्याकरण नसलेली त्रिवेणी कला, रोमांचक आहे. म्हणूनच या कलेला आत्मसात करण्यासाठी चित्रकार सूर्यवंशी यांनी अथक मेहनत घेतली. त्यातूनच निर्माण झालेली त्यांची अमूर्त शैली उत्स्फूर्त अभिव्यक्तीची चैतन्यदायी मूर्तिमंतता भासते.
दृश्यकलाकार यांच्या कलासृजनाला उचित व्यासपीठ मिळायला हवं असतं. अशा वेळी जर समूह प्रदर्शन आयोजिलेले असेल, तर मात्र त्या दृश्यकलाकाराला प्रोत्साहनच मिळतं. मुंबईमध्ये ‘आर्टिवल फाऊंडेशन’ ही एक संस्था गेली काही वर्षे कार्यरत आहे. त्या संस्थेचे संचालक शरद गुरू यांनी पुढाकार घेऊन र्हासोडी या मथळ्याखाली २५ दृश्यकलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडलेल्या आहे, प्रस्थापित दृश्यकलाकाराचं काम हे सर्वभूत असतं, अशा कलाकारांच्या कलाकृतींबरोबर, ग्रामीण अप्रसिद्ध आणि प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या दृश्यकलाकारांच्या कलाकृत
कलानिर्मिती एक दीर्घायुषी सृजन असते. त्यासाठी आर्थिक आणि मानसिक प्रोत्साहनाची फार गरज असते. असे प्रोत्साहन अगदी खारूताईच्या कामाच्या स्वरूपात का होईना, परंतु सांस्कृतिक संचालनालयाने देण्याचे ठरविल्यामुळे हे सारे दृश्य कलाकार आनंदी होतील, अशी आशा करायला निश्चित हरकत नाही.