भारताच्या परिवहन क्षेत्राच्या आधुनिकीकरणावरील महाकाय गुंतवणुकीची ‘द इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकाने नुकतीच दखल घेतली आहे. कारण, ही गुंतवणूक भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा पाया रचणार आहे. भारत यावर्षी परिवहन क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर त्याच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १.७ टक्के इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहे. हे प्रमाण अमेरिका आणि बहुतेक युरोपीय देशांच्या जवळपास दुप्पट असल्याने ‘द इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकानेही त्याची दखल घेत, या तरतुदीला ‘डोळे विस्फारून टाकणारी सुधारणा’ असे नाव देत
Read More