राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले सर्वाधिक आमदार हे आमच्या बाजूने आहेत, त्यामुळे पक्ष आणि पक्षचिन्हावर आमचाचा हक्क आहे; असा युक्तीवाद राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गटाकडून सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हक्कावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला हक्क सांगितला असून याप्रकरणी आता केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे.
Read More