तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत शनिवारी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19 हजार 244 कोटींच्या या करारामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला मोठा लाभ मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोपाळ येथे दिली.
Read More
नंदुरबार शहर व परिसरातील खेड्यांमधील वाढते शहरीकरण, लोकसंख्या व गेल्या तीन वर्षांपासून झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे नंदुरबार शहर, आसपासच्या ग्रामीण क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणी पातळीत सातत्याने घट होत असल्याने, नंदुरबार शहरासाठी तापी नदीवरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वर्षभरात या योजनेला मंजूरी घेऊन नंदुरबारवासीयांना बारमाही, 24 तास पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती, राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजय
अफगाणिस्तानातील तालिबान सरकार पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहे. यावेळी मात्र कारण आहे ते सरकारमधील वाढत्या तणावाचे. अफगाणिस्तानात सुरू असलेल्या ‘तापी’ या एका महत्त्वाकांक्षी पाईपलाईन प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्याबाबत वाढत चाललेला हा तणाव आहे. ‘तापी’ म्हणजेच तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत. हक्कानी नेटवर्कचे प्रमुख आणि तालिबान सरकारमधील सिराजुद्दीन हक्कानी यांना या ‘तापी’ प्रकल्पावर नियंत्रण मिळवायचे आहे. मात्र, येथील उपपंतप्रधान म्हणून कार्यरत असलेले अब्दुल गनी बरादर अर्थात मुल्ला बरादर, ते हक
केळीच्या बागेत आपला परिवार वाढवणारे आणि वेड्या बाभळीच्या जंगलात अधिवास करणारे आमचे वाघ आहेत, जळगाव जिल्ह्यातील बागायतदार वाघांना अद्याप ओळख मिळालेली नाही. म्हणून जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमी त्यांना ‘दारिद्य्ररेषेखालील बागायतदार वाघ’ म्हणतात. आता ‘मुक्ताई भवानी वन्यजीव अभयारण्य’ घोषित केल्याने या वाघांना रेशनकार्ड तर मिळाले, आता हे क्षेत्र संकटग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्र घोषित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
तापी नदीच्या खोऱ्यात वास्तव्य. भारतातील उत्तर आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या गवती वटवट्याचे दुर्मीळ दर्शन महाराष्ट्रात घडले आहे. पक्षीतज्ज्ञांच्या मते, 'गवती वटवट्या' पक्ष्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच छायाचित्रित नोंद
जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या धरणक्षेत्रानजीकची विश्रामगृहे व रिक्त वसाहतींचा विकास आणि व्यवस्थापन सार्वजनिक-खाजगी सहभाग (पीपीपी) तत्त्वावर खाजगी यंत्रणांकडून करण्यासाठीच्या धोरणास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली
राज्यातील कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिमवाहिनी नद्या व महानदी खोर्यांच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यास शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य जल परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जळगाव तालुक्यातील २५ गावांच्या पाणी टंचाई निवारणासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी तालुक्यातील सरपंच व शेतकरी यांच्या समवेत जळगाव ३ रोजी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.
तालुक्यातील आच्छी येथील तापी नदीच्या पात्रात रेतीचा घाटाच्या ठिकाणाहून दिवस रात्र वाळूचे अमाप व बेकायदा उत्खनन होत आहे.