'महाट्रान्सको' अंतर्गत अतिरिक्त कार्यकारी अभियंता व उप कार्यकारी अभियंता या पदांसाठी भरती करण्यात येत आहे. परंतु, या पदभरतीसंदर्भात महाट्रान्सकोकडून नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. या भरतीसाठी आता दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
Read More
महापारेषण अंतर्गत मोठी भरती केली जाणार असून महाराष्ट्र विद्युत महामंडळात नोकरी करु इच्छिणाऱ्यांना चांगली संधी मिळणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, महापारेषणकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार 'विद्युत सहायक' या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
Mahatransco (महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी) च्या संचालक (प्रकल्प) या पदाचा कार्यभार सुनील सूर्यवंशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.सूर्यवंशी यांनी पुणे विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.ते पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात १९९४ मध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झाले. तद्दनंतर ते २००६ साली थेट भरतीमध्ये कार्यकारी अभियंता या पदावर रूजू झाले. विभागांतर्गत बढतीव्दारे २०१३ मध्ये अधीक्षक अभियंता आणि २०२२ मध्ये मुख्य अभियंता या पदावर रुजू झाले.
देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अर्थात महापारेषण आता थेट व्हॉट्सॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाली आहे. महापारेषणच्या सद्यस्थितीतील प्रकल्पांची माहिती, संचलन व कार्यक्रमांची अचूक, अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.