Mahatransco च्या संचालक (प्रकल्प) पदाची सुनील सूर्यवंशी यांच्याकडे सुत्र

    14-Oct-2023
Total Views |
 
 
Sunil Suryawanshi
 
 
Mahatransco च्या संचालक (प्रकल्प) पदाची सुनील सूर्यवंशी यांच्याकडे सुत्र
 
 
मुंबई: Mahatransco (महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी) च्या संचालक (प्रकल्प) या पदाचा कार्यभार सुनील सूर्यवंशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.सूर्यवंशी यांनी पुणे विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.ते पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात १९९४ मध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झाले. तद्दनंतर ते २००६ साली थेट भरतीमध्ये कार्यकारी अभियंता या पदावर रूजू झाले. विभागांतर्गत बढतीव्दारे २०१३ मध्ये अधीक्षक अभियंता आणि २०२२ मध्ये मुख्य अभियंता या पदावर रुजू झाले.
 
 
त्यांना प्रकल्प, चाचणी, संचलन व व्यवस्था, ईआरपी, आर ऍन्ड सी कक्ष, सीएमडी कार्यालय इत्यादी कामाचा सुमारे तीस वर्षांचा अनुभव आहे.