भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्त्रो' गगययान मोहिमेतंर्गत अवकाशात अंतराळवीरांना पाठविणार आहे. इस्त्रोने चंद्रयान ३ आणि आदित्य एल १ या महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी करत पुन्हा एकदा गगनझेप घेण्याची तयारी केली आहे. दरम्यान, भारत २०२५ पर्यंत महिलांना अंतराळात पाठविणार आहे.
Read More
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी गगनयान मोहिमेच्या क्रू एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी केली. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी १० वाजता प्रक्षेपित करण्यात आले. त्यास टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (टीव्ही-डी1) असे नाव देण्यात आले होते.
जग आज भारताकडे सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यात समान भागीदार म्हणून पाहत आहे, असे विधान केंद्रीय (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अंतराळ आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील सर्वात ज्येष्ठ राष्ट्रप्रमुख आहेत आणि इतर प्रत्येक राष्ट्रप्रमुख त्यांच्याकडे आदराने बघतात, असेही सिंह यावेळी म्हणाले.
भारतीय अवकाश संशोधन संघटनेने (इस्रो) मिशन गगनयानच्या यशाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इस्त्रोने बुधवारी लिक्विड प्रोपेलंट विकास इंजिनची तिसरी यशस्वी दीर्घ-काळातील चाचणी घेतली. स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी या प्रचंड यशाबद्दल इस्रोचे अभिनंदन केले. इस्रोच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी 'अभिनंदन' लिहिले. तसेच त्यांनी भारताच्या ध्वजाचे इमोजी ठेवले.
दीर्घकालीन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा रोडमॅप
डिजिटल भरारी घेत असताना भारतासारख्या देशाला आणखी पन्नास उपग्रहांची आवश्यकता असल्याचे मत इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. ए. एस. किरण कुमार यांनी व्यक्त केले.