देशाला आणखी ५० उपग्रहांची गरज : डॉ. ए. एस. किरण कुमार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2019
Total Views |




मुंबई : डिजिटल भरारी घेत असताना भारतासारख्या देशाला आणखी पन्नास उपग्रहांची आवश्यकता असल्याचे मत इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. ए. एस. किरण कुमार यांनी व्यक्त केले. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात पन्नास उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या विविध योजना आखण्यात आल्या असून सरकारचा पूर्णपणे यासाठी पाठिंबा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम या परिषदेत समारोप समारंभावेळी भारताचे अंतराळ क्षेत्रातील योगदान या विषयावर ते बोलत होते.



ते म्हणाले, आपण या क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे, मात्र अजूनही इतकी मोठी लोकसंख्या आणि घनता असलेल्या देशाला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जोडण्यासाठी आणखी पन्नास उपग्रहांची आवश्यकता आहे. भारताने आत्तापर्यंत पन्नासहुन अधिक उपग्रह अंतराळात झेपावले आहेत. मात्र आपली गरजही शंभराहून अधिक उपग्रहांची आहे. येत्या काळात गगनयानसह अन्य उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचे ध्येय इस्त्रोने ठेवले आहे, ते आपण नक्कीच पूर्ण करू , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगात सर्वात कमी किमतीत अवकाश तंत्रज्ञान विकसित करणारी संस्था, अशी आपली ओळख आहे, सार्क देशांसाठी भारताने उपग्रह पुरवले आहेत, याचे कौतुक अफगाणिस्तानकडून करण्यात आले आहे, देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गगनयान भरारी घेणार आहे. येत्या काळात अंतराळ संशोधनाची परिभाषा बदलणार आहे, अंतराळ पर्यटनसारख्या संकल्पना उदयास येत आहेत. या सार्‍यासाठी आपण सज्ज असणार आहोत, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.





यावेळी जैवतंत्रज्ञान आणि व्यावसायिक संधी या विषयावर जेनकोव्हेलचे अध्यक्ष दीपक घैसास यांनी मार्गदर्शन केले
. प्रेसिस्टन्ट सिस्टमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि अर्थव्यवस्था या विषयावर व्याख्यान दिले. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे सहसचिव शैलेश त्रिवेदी यांनी तीन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमाला यशस्वी केल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले. स्वामी विज्ञानंद यांनी पुढील वर्षी हॉलंडमध्ये होणार्‍या वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमची घोषणा यावेळी केली.

@@AUTHORINFO_V1@@