अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याचा 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' हा धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. एकीकडे चित्रपटाची चर्चा जोर धरु लागली असताना दुसरीकडे भाऊबीजेच्या निमित्ताने प्रसाद ओकने केलेली पोस्ट देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. प्रसाद ओक याने या पोस्टमध्ये प्रत्येक भाऊ हा आनंद दिघे यांच्यासारखा असावा असे म्हटले आहे.
Read More
हर्षल संतोष जोशी या उमद्या व सहृदयी तरुणाचे ऐन भाऊबिजेच्या दिवशी अपघाती निधन झाले. त्याचे अचानक जाणे, ही त्याच्या कुटुंबाची खूप मोठी हानी तर आहेच; पण समाजाचीसुद्धा खूप मोठी हानी आहे. या समाजाला आपल्या सारख्या तरुणांची खूप गरज आहे आणि समाजासाठी, त्यांचे दुःख दूर करण्यासाठी काम करणे आपले कर्तव्य आहे, असे मानणारा हर्षल सहृदयी, तत्पर स्वयंसेवक काळाने हिरावला आहे.
दिवाळीचा पाडवा काल साजरा करण्यात आला. बहीण भावाच्या नात्याचा गोडवा वाढवणारा भाऊबीजेचा सण आज साजरा होत आहे.