मुंबई : अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याचा 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' हा धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. एकीकडे चित्रपटाची चर्चा जोर धरु लागली असताना दुसरीकडे भाऊबीजेच्या निमित्ताने प्रसाद ओकने केलेली पोस्ट देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. प्रसाद ओक याने या पोस्टमध्ये प्रत्येक भाऊ हा आनंद दिघे यांच्यासारखा असावा असे म्हटले आहे.
प्रसादने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने धर्मवीर सिनेमातील आनंद दिघे यांच्या लूकमधील फोटो शेअर केला आहे. "भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम रहावा,प्रत्येक बहिणीच्या पाठिशी आनंद दिघेंसारखा भाऊ असावा", असं कॅप्शन प्रसादने या फोटोवर दिलं आहे. दरम्यान, प्रसादची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंगेश देसाई निर्मित आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.