सावरकरांचे मोठेपण मान्य करणे काही लोकांसाठी राजकीय तोटा आहे. हे लोक सावरकरांना विरोध करतात. सावरकरांवरील आक्षेपांना उत्तर देण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सावरकर विचारांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
Read More
भारतात दुष्प्रचार युद्ध किंवा खोट्या बातम्यांचा प्रसार हा कोरोना विषाणूच्या संक्रमणापेक्षाही अधिक वेगाने आणि धोकादायक पद्धतीने होतो आहे. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३०जानेवारीला सापडला. मात्र, त्यापूर्वीच सोशल मीडियावर खोट्या पोस्ट, अफवा, त्यावरचे उपचार याबाबतच्या व्हिडिओंनी थैमान घातले होते. तेव्हा, हा अपप्रचार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे.