रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात 'संकटग्रस्त' असणाऱ्या कोळसुंद्यांचे म्हणजेच रानकुत्र्यांचे दर्शन झाले आहे (wild dog sighting in mangaon). बुधवार दि १८ सप्टेंबर रोजी तालुक्यातील डोंगरोली गावात १० रानकुत्र्यांचा कळप पहिल्यांदाच नजरेस पडला. डोंगरोली बांबू नर्सरीच्या दया आणि आनंद पत्की या दाम्पत्याने हे कुत्रे पाहिले आणि छायाचित्रित देखील केले (wild dog sighting in mangaon). यानिमित्ताने कोकणात विस्तारणाऱ्या रानकुत्र्यांचा अधिवास हा अभ्यासाचा विषय बनला आहे. (wild dog sighting in mangaon)
Read More
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गावात 'मॅकक्वीनस् बस्टर्ड' नावाचा पक्षी आढळून आला आहे. गावातील एका गावकऱ्याच्या घराच्या आवारात हा पक्षी आढळून आला. घरातील पाळीव मांजर या पक्ष्याच्या मागे लागल्यामुळे घरातल्यांना त्याचे अस्तित्व लक्षात आले. हा पक्षी अबू धाबीहून पाकिस्तान मार्गे भारतात आल्याचे लक्षात आले. या पक्ष्याच्या पायांवर असेलेल्या दोन विशिष्ट रिंग होत्या. त्यावर काही अक्षरे आणि आकडे होते. त्यातील एका रिंग वर अबू धाबी लिहले होते.
महाराष्ट्रातील ताडोबा, नागझिरा, फनसाड, पेंच या अभयारण्यापाठोपाठ तानसा अभयारण्य पक्षीनिरीक्षक व निसर्गप्रेमींच्या पसंतीस उतरले आहे. हिवाळ्याच्या मोसमात तानसा जलाशय परिसरात मुक्कामी असलेल्या विदेशी पक्ष्यांचे थवे विशेष लक्ष वेधत आहेत.
गुरुवारी सकाळी 9:45 ते दुपारी 12:30 वाजेदरम्यान पाचोरा तालुक्यातील पहाण गावी फिर्यादी दिलीप दगडू पाटील (45) यांच्या राहते घराच्या ओसरीत ठेवलेली चाबी घेऊन अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला.