शिखांचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंदसिंह ( Guru Govind Singh ), हे थोर योद्धे, दार्शनिक चिंतक लेखक आणि संगीत मर्मज्ञ कवी होते. महाराष्ट्रातील नांदेड येथे त्यांचे बलिदान स्मारक, गुरूद्वारा आहे. त्यांच्या नावावर अनेक काव्यग्रंथ आहेत. प्रभु रामचंद्राविषयी त्यांच्या मनी विशेष श्रद्धाभाव होता. त्यांचा ‘२४ अवतार’ नावाचा ग्रंथ सर्वपरिचित आहे. त्यापैकीच एक वैशिष्ट्यपूर्ण काव्यग्रंथ म्हणजे ‘रामावतार’ होय. गोविंदसिंह यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी इ. स. १६९८ साली त्यांनी, सतलज नदी किनारी नैना देवी परिसरात ‘र
Read More
नाशिक : हिंदू देव-देवतांवर खालच्या पातळीवर टीका करुन हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल मौलाना साजिद रशिदी याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महर्षी पंचायतन सिद्धपीठमचे महंत तसेच ‘अखिल भारतीय संत समिती’, धर्म समाज महाराष्ट्र प्रदेश प्रमुख आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे ( Aniketshastri ) यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे पत्र उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सपकाळे यांना सोमवार, २ डिसेंबर रोजी देण्यात आले.
दाऊदी बोहरा समुदायाच्या धर्मगुरूच्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सय्यदना ताहेर फखरुद्दीन यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या दाऊदी बोहरा समाजाचा धार्मिक नेता म्हणून नियुक्ती करण्यावर आक्षेप घेत सय्यदना ताहेर फखरुद्दीन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
चीनच्या दडपशाहीला न जुमानता ज्येष्ठ बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक धर्मगुरु म्हणून एका अमेरिकन मंगोलियन मुलाचं नाव दिलं आहे. यामुळे चीनला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.