दाऊदी बोहरा समुदायाच्या धार्मिक नेत्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

    23-Apr-2024
Total Views |
 dawoodi bohras
 
मुंबई : दाऊदी बोहरा समुदायाच्या धर्मगुरूच्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सय्यदना ताहेर फखरुद्दीन यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या दाऊदी बोहरा समाजाचा धार्मिक नेता म्हणून नियुक्ती करण्यावर आक्षेप घेत सय्यदना ताहेर फखरुद्दीन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 
फखरुद्दीन यांची याचिका फेटाळत मुंबई उच्च न्यायालयाने सय्यदना सैफुद्दीन हेच धार्मिक नेते राहावेत, असा निर्णय दिला आहे. दाऊदी बोहरा समाजाचे ५३ वे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या एकल खंडपीठाने सांगितले की, न्यायालयाने "केवळ पुराव्याच्या आधारावर निर्णय घेतला आहे, आस्थेच्या आधारावर नाही.
 
हे वाचलंत का? -  "भारतीय राज्यघटना आमच्यावर लादली, आम्हाला दुहेरी नागरिकत्व द्या"- काँग्रेस उमेदवाराचे वादग्रस्त वक्तव्य
बोहरा समुदायाचे धार्मिक नेते कुतुबुद्दीन यांचे २०१६ मध्ये निधन झाल्यानंतर, . सैफुद्दीनला सय्यद हे धार्मिक नेते बनले. पण, कुतुबद्दीन यांचा मुलगा ताहिर फखरुद्दीन यांनी न्यायालयात याचिक दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी दावा केला होता की, त्यांच्या वडिलांनीत्यांना आधिकार दिलेले आहेत. म्हणून सैफुद्दीनला सय्यदना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याची मागणी या खटल्यात न्यायालयाकडे करण्यात आली.
 
फखरुद्दीन यांनी असा दावा केला की "त्यांच्या वडिलांनी त्यांची मृत्यूपूर्वी या पदावर नियुक्ती केली होती." खटला फेटाळून लावताना न्यायमूर्ती पटेल म्हणाले, "मला कोणताही गोंधळ नको आहे. मी निर्णय शक्य तितका तटस्थ ठेवला आहे. मी केवळ पुराव्याच्या मुद्यावर निर्णय दिला आहे, आस्थेच्या आधारावर नाही." सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन हे ५३ वे अल-दाई अल-मुतलक आणि जगभरातील दाऊदी बोहरा समुदायाचे विद्यमान धार्मिक नेते आहेत.