दलाई लामांचा चीनला मोठा धक्का

मंगोलियन बालकाला केले ’धर्मगुरु’

    25-Mar-2023
Total Views |
us-child-named-reincarnation-of-buddhist-spiritual-leader-by-the-dalai-lama
 
ल्हासा : चीनच्या दडपशाहीला न जुमानता ज्येष्ठ बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक धर्मगुरु म्हणून एका अमेरिकन मंगोलियन मुलाचं नाव दिलं आहे. यामुळे चीनला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

नवीन आध्यात्मिक नेत्याचा उत्सव साजरा करण्यासाठी नुकतेच ६०० मंगोलियन लोक जमले होते. त्यासंदर्भात सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये लाल कपडे घातलेला आणि मास्क घातलेला एक मुलगा ८७ वर्षीय दलाई लामा यांना भेटताना दिसत आहे. या मुलाचे वय अवघं ८ वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. हा मुलगा जुळ्या मुलांपैकी एक आहे. दलाई लामा यांनी या मुलाचे वर्णन १० व्या खलखा जेत्सून धम्पा रिनपोचे यांचा पुनर्जन्म असं केलंय. बौद्ध धर्मात धार्मिक नेत्यांच्या पुनर्जन्माला विशेष महत्त्व दिलं जातं.
 
दरम्यान, हिमाचल प्रदेशात असलेल्या धर्मशाळा, इथं धार्मिक नेत्यांचा पुनर्जन्म सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला होता. इथं शेकडो मंगोलियन त्यांच्या नवीन आध्यात्मिक नेत्याचा उत्सव साजरा करण्यासाठी जमले होते. दलाई लामाही इथं राहतात. या सोहळ्यामुळं मंगोलियाचा शेजारी चीन नाराज होण्याची शक्यता आहे. तरीही चीनच्या दडपशाहीला न घाबरता तिबेटी धर्मगुरुंनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.