लोकसभा निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वच पक्ष आणि उमेदवारांकडून जोरदार प्रचार चालू असला तर मतदारांमध्ये निवडणुकीबाबत मोठा उत्साह पाहायला मिळालेला नाही. गेल्या दोन ते तीन टप्प्यात झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Read More
’वर्ल्ड स्लीप डे’ म्हणजेच 'जागतिक निद्रा दिन' जगातील ८८हून अधिक देशांमध्ये दि. १७ मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने अपेक्स हॉस्पिटल समूहातर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार मुंबईतील लोकलमधून प्रवास करणारे मुंबईकर आठवड्याला ३ तास आणि महिन्याभरात सुमारे १२ तास झोप पूर्ण करत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.
सततच्या मानसिक ताणतणावाला सामोरे जाताना 'पार्टी कल्चर'चा आधार घेणाऱ्या मुंबईकरांमध्ये हृदयविकार वाढत असल्याचे निरीक्षण बोरिवलीतील 'अपेक्स हॉस्पिटल' समूहाने नोंदविले आहे. आपला मृत्यू हृदयविकारांमुळे होईल, अशी भीती मुंबईकरांना सतावत असल्याची नोंद गेल्या सहा महिन्यामध्ये पाचशेहुन अधिक मुंबईकरांशी संपर्क साधल्यावर अपेक्स हॉस्पिटल समूहाकडे आहे.