“ओ भाई, इंडिया कसा जिंकला, तर त्यांच्या एका एका खेळाडूसोबत दोन दोन पंडित होते. एकूण २२ पंडित होते. त्यांनी जादूटोणा केला. बताओ तभी तो जादूटोणा करून ‘इंडिया’ जिंकला. पंडितांना घेऊन पाकिस्तानमध्ये आले असते, तर त्यांचे बिंग फुटले असते. म्हणून तर इंडियाच्या क्रिकेटर्सनी पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला.” समाजमाध्यमांवर सध्या व्हायरल झालेला पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींचा हा व्हिडिओ पाहून भयंकर करमणूक झाली. १९४७ साली भारतापासून फुटून पाकिस्तानने काय मिळवले? तर २०२५ साली हे असे अगाध अज्ञान वाटणारी पाकिस्तानची जाहिल प
Read More
इस्रायल-‘हमास’ युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक राजकारणात पश्चिम आशिया क्षेत्र केंद्रस्थानी आले. इस्रायल-‘हमास’ युद्ध, गाझा पट्टीतील छोट्याशा भूभागावर लढण्यात येत असले तरी, या युद्धाचे राजकीय, आर्थिक परिणाम संपूर्ण जगाला भेडसावत आहेत. पश्चिम आशियातील प्रादेशिक शक्ती विरूद्ध जागतिक महाशक्ती असा संघर्षही इस्रायल-‘हमास’ युद्धामुळे उफाळून आला. यात जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होताना दिसतात.
कुठल्याही ठिकाणी सरकारतर्फे प्रकल्प उभारणी करताना स्थानिकांची मतंही विचारात घेतली जातात. तसेच त्या संभाव्य प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना कसा अधिकाधिक रोजगार मिळेल, प्रकल्पाबरोबरच त्या क्षेत्राचाही कसा सर्वांगीण विकास होईल, अशा विविध बाबींचा काळजीपूर्वक विचार करणे हे क्रमप्राप्त. बरेदचा आपल्याकडेही प्रकल्पविरोधातून आंदोलन पेटते. प्रकरण न्यायालयात जाते आणि प्रकल्प ठप्प तरी पडतो किंवा त्यातून दोन्ही बाजूंना मान्य असेल असा तोडगा तरी सामोपचाराने काढला जातो.
बलुचिस्तानात चीनकडून उभारण्यात येणार्या ग्वादर बंदरावर वचक ठेवण्यासाठी चाबहार या प्रकल्पाचे महत्त्व होते. जर चीन इराणमध्ये ४०० अब्ज डॉलर गुंतवणूक करुन जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणार असेल, तर चिनी प्रकल्पांपुढे भारताचा रेल्वेमार्ग बांधणी प्रकल्प किरकोळ आहे.
चीनच्या 'वन बेल्ट वन रोड' आणि 'सीपेक' या महत्त्वाकांक्षी व्यापारमार्गांच्या पटलावरील कराचीनजीकचे ग्वादार हे एक महत्त्वाचे बंदर. चीनच्या 'कोस्को' (चायनीज ओशन शिपिंग कंपनी) कंपनीने कराची ते ग्वादारदरम्यानची कंटेनर लाईनर सेवा बंद केली आहे.
ग्वादरच्या एका सामान्य बलुची व्यक्तीचे म्हणणे आहे, “सीपेकमुळे आम्हालाही विकासात भाग घेता येईल. पण, तो कसा आणि किती? तर रस्त्याने जात असलेल्या चिनी गाड्यांचे पंक्चर काढण्याइतकाच.”
सीपेक म्हणजेच चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग, हा चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. पाकिस्तानचा त्याला किती फायदा होईल, ही दुय्यम बाब असली तरी चीनला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे.