साधकाच्या जडजीवनातील संस्कारांना धरून या लिंगदेहाला चांगल्या वा वाईट इच्छा राहू शकतात, म्हणून लिंगदेही अवस्थेत राहणारे पिशाच्चादी जीव, इतर जडशरीरांना झोंबून त्याद्वारे आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात. लिंगदेहाला जडशरीर नसल्यामुळे, त्याच्या इच्छातृप्तीकरिता त्याला इतर जडशरीरांवर कब्जा करून, इच्छापूर्ती करावी लागते. म्हणून पिशाच्चे इतरांना झोंबतात, त्यांच्या शरीराचा कब्जा घेतात आणि इच्छापूर्ती झाल्यावर ते शरीर सोडून निघून जातात. प्रबळ इच्छेने वा वासनेने प्रेरित झालेले लिंगदेही म्हणजेच पिशाच्च होत. मेल्यावर प्रत
Read More
आर्यजन भोगवस्तूच्या पलीकडे जाऊन म्हणजे एका अर्थाने भोगघटनेला चिरीत जाऊन त्यापलीकडील सत्य जाणण्याचा सर्वदा प्रयत्न करतात. म्हणून ते आर्य. कधीच थांबत नाहीत आणि कधीच नष्ट होत नाही. सतत पुढे जाणारा, भोगातून अमर आनंद प्राप्त करणारा तो ‘आर्य असतो मा सद्मय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय’ म्हणून जो सामर्थ्यवान असेल तोच भोग भोगू शकेल. शक्तिहीनांना काहीच प्राप्त होऊ शकत नाही.
सूर्याच्या किरणांचे पृथक्करण केल्यास त्यातून दृश्यमान होणारे सप्तरंगच असतात. परंतु, या सप्तरंगापूर्वी आणि नंतरही अनेक रंग शलाका असतात. लाल रंगापूर्वीच्या रंग शलाकांना ‘इन्फ्रारेड’, तर जांभळ्या रंगानंतरच्या रंगशलाकांना ‘अल्ट्राव्हायोलेट’ असे म्हणतात. विद्युत उपकरणात या रंगशलाका दृग्गोचर होतात; पण मानवी नेत्र त्या रंगशलाका पाहू शकत नाही. दर सेकंदाला २० ते २० हजारांपर्यंत कंपन असणारे नादच माणसाला ऐकू येतात. त्या अगोदरचे किंवा त्यानंतरचे नाद माणसाच्या कर्णेंद्रियाला चेतवू शकत नाहीत.