भारताची बँडमिंटनपटू सानिया मिर्झाची बहीणी अनम मिर्झाने सोशल मीडीयावर पोस्ट करत UPI अॅप्स वापरण्याविरुद्धचा सल्ला आपल्या फॉलोवरना दिला आहे. अनमने इंस्टाग्रामवर असा खुलासा केला आहे की, तिने गुगल पेसह UPI अॅप्स वापरणे बंद केले आहे. अनमने पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती म्हणते की, "यावर्षी पासून मी गुगल पे वापरणे बंद केले, मी माझे यूपीआय अकाउंट रिकामी करून, माझ्या फोनमधील सर्व यूपीआय अॅप्स मी डिलीट केले आहेत." यातून अनमच्या मते, ती तीच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यात अधिक सक्षम झाली आहे.
Read More
'सावनी' नंतर आता गुहागर किनाऱ्यावर सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या 'रेवा ' या मादी ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाचा 'लोकेशन सिग्नल' २२ जून रोजी बंद झाला आहे. सॅटलाईट ट्रान्समीटरची बॅटरी संपल्यामुळे हे प्रसारण थांबले असावे असे वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाउंडेशन'ने सांगितले. गुहागर पासून मंगळूरच्या सागरी परिक्षेत्रापर्यंत या मादी कासवाने प्रवास केला होता. 'रेवा'ने आतापर्यंत २३२८ किमीचे अंतर कापले, तर ३३० मीटर पर्यंत खोल डुबकी मारली होती. 'रेवा'चे शेवटचे स्थान कारवार, कर्नाटकच्या किनाऱ्यापासून ९० किमी अंतरावर होते.
इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स या देशांत तब्बल ४० हजारहून अधिक युनियन कामगारांनी संपाचे अस्त्र पुकारले आहे. हा संप गेल्या ३० वर्षातील सर्वात मोठा रेल्वे संप आहे. वाढीव वेतनाबाबत कामगार संघटना आणि रेल्वे कंपन्यांमधील चर्चा भंगल्यानंतर कामगारांनी तीन दिवसासाठी वॉकआउट करण्याचा निर्णय घेतला.
देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीत ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.तेव्हा,कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असतानाच कोविड लसीकरणाला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत.