पती-पत्नीच्या भांडणामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. लुफ्थांसा एअरलाइन्सचे हे विमान जर्मनीतील म्युनिक येथून थायलंडची राजधानी बँकॉकला जात होते. भांडणामुळे फ्लाइट क्रूने प्रथम पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. मात्र परवानगी न मिळाल्याने विमान दिल्ली विमानतळावर उतरले.
Read More
‘आमच्या विमानात एक घोडा सैरावैरा धावतोय, आम्हाला त्याला पकडता येत नाहीये.आम्हाला इमर्जन्सी लँडिंग करायची आहे..." होय, तुम्ही ते बरोबर वाचलात. ३१,००० फूट उंचीवर उड्डाण करणाऱ्या विमानाच्या पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला मदतीसाठी हा ऑडिओ मेसेज पाठवला, तेव्हा त्याचाही यावर विश्वास बसला नाही. ही बाब दि.१६ नोव्हेंबर २०२३ ची आहे.