विमानात पती-पत्नीचं भांडणं, बँकॉकला जाणारं विमान दिल्लीत उतरलं

    30-Nov-2023
Total Views |
 
Lufthansa Airlines
 
 
नवी दिल्ली : पती-पत्नीच्या भांडणामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. लुफ्थांसा एअरलाइन्सचे हे विमान जर्मनीतील म्युनिक येथून थायलंडची राजधानी बँकॉकला जात होते. भांडणामुळे फ्लाइट क्रूने प्रथम पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. मात्र परवानगी न मिळाल्याने विमान दिल्ली विमानतळावर उतरले.
 
 
 
लुफ्थांसा एअरलाइन्सचे फ्लाइट LH772 बुधवारी (29 नोव्हेंबर 2023) म्युनिकहून बँकॉकसाठी उड्डाण केले. विमानाने उड्डाण करताच पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. सकाळी 10.26 वाजता विमान दिल्लीत उतरलं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, केबिन क्रूने फ्लाइटमधील प्रवाशांचे वागणे त्रासदायक असल्याचं आणि पती-पत्नीमधील भांडण विकोपाला गेल्याचं सांगितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
 
दरम्यान, या जोडप्याने माफी मागितली आहे. मात्र, प्रवाशाला भारतातील तपास यंत्रणांकडे सोपवायचं की माफीचा विचार करून त्याला जर्मनीला परत पाठवायचं याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असं डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.