उत्तरप्रदेशमधील अमरोह जिल्ह्यात भगवान कृष्णकालीन मंदिरात अश्लिल रिल्स शूट (Reel Shoot) करण्यात आले. यामुळे अमरोह जिल्ह्यातील हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. अमरोह जिल्ह्यातील युट्यूबर्स दिलशाद आणि अझीम यांच्यावर रिल्स अश्लिल रिल्स बनवल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली आहे. २ ऑगस्ट रोजी याप्रकरणाचा तपास सुरू होता. अमरोह येथील कोतवाली नगर पोलीस ठाणे हद्दीत आहे. येथे शुक्रवारी पोलीस उपनिरिक्षक परशुराम यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
Read More