नीला फिल्म प्रॉडक्शनची डिजिटल शाखा, नीला मीडियाटेकने अधिकृतपणे हंग्री गोली, तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) च्या लाडक्या दुनियेतून प्रेरित असलेला एक रोमांचक मोबाइल गेम लाँच केला आहे. रन जेठा रन आणि भिडे स्कूटर रेस यांसारख्या मागील विजेतेपदांच्या यशानंतर, हंग्री गोली चाहत्यांना एक आकर्षक आणि तल्लीन करणारा अनुभव देत TMKOC विश्वाचा विस्तार करते.
Read More
पॅरिस ऑल्पिम्पिक २०२४ मध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या अमान सहरावत याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. नुकतंच अमानला लोकप्रिय कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो आवडत असल्याचे समजले आहे. २००८ पासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील जेठालाल हे पात्र सगळ्यांच्याच विशेष आवडीचं आहे. दरम्यान, अमानच्या या आवडीबद्दल जेठालाल अर्थात अभिनेते दिलीप जोशी यांना आनंद झाला असून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
दयाबेन, जेठालाल यांचे चाहते प्रेक्षकांमध्ये नसतील असं फार क्वचितच असेल नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही विनोदी मालिका गेले १६ वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. या दरम्यान, अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली त्यात सगळ्यांची लाडकी दयाबेन देखील आहेच. पण गेले अनेक वर्ष दया या मालिकेत नसूनही तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेची लोकप्रियता काही कमी झाली नाही. आता या मालिकेतून आणखी एका कलाकाराने शो सोडल्याची बातमी समोर आली आहे.
टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिकेचा प्राण म्हणजे दयाबेन टप्पूके पापा गडा अर्थात अभिनेत्री दिशा वकानी. दयाबेन अहमदाबादला गेल्याचे मालिकेत दाखवले आणि सहा वर्षांपूर्वी तिने शोला रामराम केला होता. इतक्या वर्षांपासून दयाबेन शोमध्ये परतणार कमबॅक कधी करणार अशी चर्चा आहे. दयाबेन नसल्याने शोचे अनेक चाहते नाराज असून दयाबेनच्या कमबॅकची अनेकांना प्रतिक्षा आहे. आता ही प्रतिक्षा संपणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दयाबेनच्या आवाजत गोकुळधाम सोसायटीमध्ये गरब्याचे