शहर काँग्रेसला तब्बल आठ वर्षांनंतर प्रभारी का होईना, शहराध्यक्ष मिळाले. प्रभारी शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच शहरात पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. पक्षांतर्गत छाजेड यांच्या विरोधातील गट पुन्हा सक्रिय झाला असून, त्यांच्याकडून शहरात ‘समांतर काँग्रेस’ सुरू झाली आहे. समांतर काँग्रेसने शिवजयंती पाठोपाठ संत गाडगे बाबा महाराज जयंतीदेखील वेगळी साजरी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
Read More