अनुष्का शर्मा ही केवळ एक लोकप्रिय चित्रपट अभिनेत्री नसून एका लष्करी अधिकाऱ्याची कन्या म्हणूनही तिला अभिमान वाटतो. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनुष्काने भारतीय सैन्याचे मन:पूर्वक कौतुक करत एक भावनिक संदेश प्रसारित केला. त्यानंतर तिची एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा समाजमाध्यमांवर चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने करगिल युद्धाच्या काळातील अनुभव मोकळेपणाने सांगितले आहेत.
Read More
बॉलिवूड स्टार जॉन अब्राहम केवळ पडद्यावरच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही आपल्या भारतीय ओळखीचा अभिमान बाळगतो. सध्या आपल्या नवीन चित्रपट द डिप्लोमॅटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या जॉनने भारतातील सुरक्षितता, धर्म आणि राजकारण याविषयी मत व्यक्त केले.
बॉलिवूडचा बादशहा, प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता शाहरुख खान डेव्हिड लेटरमन्स शोमध्ये झळकणार हे ऐकल्यावर सगळया चाहत्यांच्या उत्साहाला पारावारच राहिले नव्हते. आज त्याच शोच्या शूटिंगदरम्यानची एक छोटीशी झलक प्रदर्शित करण्यात आली आहे.
येथील शाळेचा माजी विद्यार्थी सैन्यात देशसेवा करुन आता ज्या शाळेत शिकला त्या शाळेतील एन. सी. सी. विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी 18 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. जळगाव येथे बदली झाल्याने मिळणार आहे, ही बाब शाळेसाठी अभिमानाची आहे असे गौरवोद्गार मुख्याध्यापक बी.एन.चौधरी यांनी काढले.