प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेवी सुधा मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यसभेवर मनोनित केले आहे. सुधा मूर्ती यांची आणखी एक ओळख म्हणजे त्या प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर मनोनित करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयावर दिली. सुधा मूर्ती यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महिला शक्तीचा हा सशक्त पुरावा आहे.
Read More
विविध क्षेत्रातील मान्यवर आता विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तयार करणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) ने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची टीम तयार करण्यात येणार असून या १९ जणांच्या टीमद्वारे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. एनसीईआरटीने १९ दिग्गज व्यक्तिमत्त्वांवर जबाबदारी सोपवली आहे.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी सपत्नीक तिरुपती बालाजी देवस्थानाला भेट दिली आहे. यावेळी नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी लेखिका सुधा मूर्ती यांनी यावेळी मंदिर देवस्थानाला एक सोन्याचा 'अभिषेक शंख' आणि 'कासव' दान केला आहे. दरम्यान, हा सोन्याचा अभिषेक शंख आणि सोन्याचा कासव या दोन्ही वस्तू २ किलोचा असून त्यांची किंमत २ कोटीहून अधिक आहे. दरम्यान, मूर्ती दाम्पत्यांनी दान केलेल्या दानाला 'भूरी' दान असेही म्हणतात.