देशातील छोट्या शहरात विशेषतः ग्रामीण भागात सौर उर्जेला प्रोत्साहन केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना यासंदर्भात तरतूद केली आहे. रुफटॉप सौरउर्जा पॅनेल लावण्याकरिता येणाऱ्या खर्चात घट दिसून आली आहे. त्याचबरोबर, अर्थमंत्री बजेट भाषणात म्हणाल्या, तिसऱ्या तिमाहीत सर्वाधिक ३५ टक्क्यांपर्यंत रुफटॉप सौर पॅनेल लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
Read More
मध्य रेल्वेने आपल्या रूफटॉप सोलर उपक्रमाद्वारे शाश्वत ऊर्जा समाधानाच्या दिशेने भरीव वाटचाल सुरू ठेवली आहे. मध्य रेल्वेने आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सौरऊर्जेमध्ये ८.११९ मेगावॅटची एकत्रित क्षमता यशस्वीरित्या स्थापित केली आहे. नूतनीकरणीय उर्जा स्त्रोतांचा वापर करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या मध्य रेल्वेने छतावरील सौर प्रतिष्ठापनांमध्ये अतिरिक्त ४ मेगावॅटच्या लक्ष्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
फ्रेयर एनर्जी, भारतातील आघाडीची तंत्रज्ञानक्षम छतांवर बसविण्यात येणाऱ्या सौरऊर्जा सुविधा (रूफटॉप सोलर) कंपनीने रू. 58 कोटींची इक्विटी गुंतवणूक सुरक्षित केली आहे.भारतातील किरकोळ ग्राहकांसाठी (घरमालक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) सौरऊर्जेशी निगडीत संक्रमणाला गती देणाऱ्या शाश्वत बदलांत फ्रेयर एनर्जी आघाडीवर आहे.
मुंबई : राज्यातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविल्याने सोसायटीच्या वीजबिलात मोठी कपात झाली आहे. राज्यात ३,०२६ हाऊसिंग सोसायट्यांनी ५२ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली असून अधिकाधिक संस्थांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवावेत, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.