सरकारी रोखे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा असून अलीकडील एकूण चलनवाढीचे उच्च आकडे पाहता भविष्यात महागाई उच्च राहण्याची शक्यता आहे, असे विधान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले. ते म्हणाले, अलीकडील काळातील चलनवाढीचा डेटा पाहता सद्यस्थितीस रेपो रेटमध्ये कपात करणे धोकादायक ठरू शकते.
Read More
नुकत्याच झालेल्या पतधोरण समितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)कडून रेपोरेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत रेपोरेट ६.५० टक्के इतका ठेवला आहे.
सलग दहाव्यांदा रेपोरेट कायम ठेवत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)ने कायम ठेवलेला रेपोरेट म्हणजे नेमकं काय, याचा तुमच्या कर्जावर कसा परिणाम होतो, याबाबत जाणून घेऊयात. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपोरेटची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
आरबीआयने रेपो रेट कायम ठेवल्यानंतर रिव्हर्स रेपोरेटबद्दल जाणून घेऊयात. रिव्हर्स रेपोरेट हा अगदी रेपो रेटच्या विरुध्द असतो. म्हणजेच बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे जमा केलेल्या ठेवींवर मिळणारे व्याज म्हणजे रिव्हर्स रेपो रेट होय. रिव्हर्स रेपो रेटच्या माध्यमातून मध्यवर्ती बँकेकडे जमा केलेल्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजास रिव्हर्स रेपो रेट असे म्हटले जाते.