लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सकस आहार, हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये 'कॅलरी चार्ट' लावणे बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 'वर्ल्ड चाइल्ड ओबेसिटी' दिनानिमित्त 'जेन एक्सएल ओबेसिटी' या संस्थेमार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संयुक्त मुलाखत घेण्यात आली.
Read More
पुण्यामध्ये अनेक ठीकाणी आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाच्या शक्यतेचा अंदाज हवामान खात्याने यापुर्वी वर्तवला होता. त्यानुसार राज्यातील अनेक भागत अवकाळी पावसाची हजेरी लागण्याती शक्यता आहे. गेले अनेक दिवस पुण्यातील तापमानाने उच्चांक गाठला होता.
महाराष्ट्र मोठा होण्याचं कारणच मुळात उद्योग महाराष्ट्रामध्ये आले हेच होतं. ज्यावेळेला उद्योगांसाठी आपण रेड कार्पेट टाकलं, त्यावेळाला महाराष्ट्राची प्रगती झाली. सर्व जेवढे उद्योग भारतामध्ये येऊ इच्छितात त्यांची पहिली पसंती हा महाराष्ट्र असतो.
भोंगे उतरले नाही तर मशिदींसमोर दुप्पट आवजात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यानंतर बुधवारी (दि. ४ मे) पहाटेपासून ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सर्व मशिदींसमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी कलम १४९ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ अन्वये तब्बल १ हजार ७७५ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर, आयुक्तालय क्षेत्रातील सुमारे ३५० जणांना ताब्यात घेण्यात आले. मशिदीच्या विश्वस्तांना पहाटेच्या वेळी भोंग्याचा वापर करून नमाज पठण करू नये असे आवाहन पो
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरू असलेल्या संवाद यात्रेत आमदार धनंजय मुंडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजपचा बोलका भाऊला अर्धवटराव म्हणून संबोधले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी खोचक ट्वीट करत धनंजय मुंडेंवर चांगलाच पलटवार केला. "तुमच्या वायफळ बडबडीचा राग जरी येत असला तरी तुमची अशी अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते.", असे राजू पाटील यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे. मुंडेंवर शोषण केल्याचा आरोप करणाऱ्या करुणा यांचा अप्रत्यक्षपणे यात उल्लेख केल्याचे दिसून येत आहे.
राज ठाकरेंनी पक्ष कार्यकर्त्यांना काय कार्यक्रम दिला, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आता कदाचित मनसैनिक त्याचे उत्तर गर्वाने देऊ शकतील की, आम्हाला लोकांना घराबाहेर काढून मारण्याचा तरी कार्यक्रम मिळाला. अर्थात, हा कार्यक्रमही किती दिवस टिकेल, याची शाश्वती मनसैनिक देणार नाहीत. ‘टोल’च्या वेळी पोळून निघाल्याने ‘ट्रोल’च्या वेळी ते थोडे अधिक सावध असतील.