भारताचा उत्पादन क्षेत्राचा विकास दर सप्टेंबरमधील आठ महिन्यांच्या नीचांकी दरावरून ऑक्टोबरमध्ये ५७.५ वर पोहोचला आहे. हंगामी समायोजित एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स(पीएमआय) सप्टेंबरमध्ये ५६.५ च्या आठ महिन्यांच्या नीचांकीवरून ऑक्टोबरमध्ये ५७.५ वर पोहोचला असून ऑपरेटिंग परिस्थितीत लक्षणीय आणि जलद सुधारणा दर्शवित आहे, अशी माहिती मासिक पाहणीत देण्यात आली.
Read More
णासुदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. आरबीआयच्या स्टेट ऑफ द इकॉनॉमी अहवालात अर्थव्यवस्थेसंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. काही उच्च-वारंवारता निर्देशकांमध्ये मंदी असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. परंतु, सणासुदीच्या काळात उपभोगाच्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे आरबीआयने म्हटले आहे.
मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये देशातील सेवा क्षेत्रातील वाढ कमी झाली असली तरी देशातील व जागतिक पातळीवरील मोठी मागणीमुळे मोठी वाढ होण्याचे आश्वासक चित्र असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. एप्रिल महिन्याचा एस अँड पी ग्लोबलचा एचएसबीसी फायनल इंडिया सर्विसेस परचेसिंग मॅनेजर निर्देशांक जाहीर झाला आहे. ज्यामध्ये मार्चच्या ६१.२ मधील तुलनेत एप्रिलमध्ये ६०.८ हा निर्देशांक कमी झाला असला तरी वाढत्या मागणीमुळे सेवा क्षेत्रात आश्वासक चित्र असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. गेल्या १४ वर्षातील सर्वाधिक वाढ असल्याचेही अहवालात